महिलेच्या गळ्याला सुरा लावून भरदिवसा हिसकावलं मंगळसूत्र, घटना CCTV मध्ये कैद

महिलेच्या गळ्याला सुरा लावून भरदिवसा हिसकावलं मंगळसूत्र, घटना CCTV मध्ये कैद

भरदिवसा महिलेच्या गळ्याला सुरा लावून एका चोरट्यानं तिचं मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

सचिन जिरे (प्रतिनिधी),

औरंगाबाद, 29 जुलै: एका तरुणानं ओळखीतील व्यक्तीच्या घरात घुसून त्याच्या मुलावर गावठी रिव्हॉल्वर रोखून लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असताना शहरात आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. भरदिवसा महिलेच्या गळ्याला सुरा लावून एका चोरट्यानं तिचं मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली आहे.

शहरातील मयूरनगर भागात बुधवारी सकाळी ही घडली घटना आहे. चोरटा दुचाकीवरून पसार झाला आहे. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सिडको पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा...फेक फॉलोअर्स रॅकेट: क्रिकेट कॉमेंटेटर आणि रेडिओ जॉकीला मुंबई पोलिसांचा समन्स

दिवसाढवळ्या घरात घुसून मुलाच्या कपाळावर रोखलं रिव्हॉल्वर...

कर्जबाजारी झालेल्या एका तरुणानं चक्क ओळखीतील व्यक्तीच्या घरी जाऊन मुलावर रिव्हॉल्वर रोखून लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत त्याच्या हातातील रिव्हॉल्वर हिसकावून त्याला पकडलं. ही घटना मंगळवारी दिवसाढवळ्या हर्सूल जवळील हरसिद्धी हाऊसिंग सोसायटीत घडली होती. पोलिसांनी हल्लेखोर तरुणासह गावठी रिव्हॉल्वर ताब्यात घेतलं आहे. राहुल रावसाहेब आधाने असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे.

संजय गाडे याच्या घरी हा चोरीचा प्रयत्न झाला. संजय गाडे हे वाळूज औदोगिक परिसरात एका कंपनीत जनरल मॅनेजर आहेत. गाडे आणि आरोपी राहुलच्या नातेवाईकांचे चांगले संबंध आहे. मात्र, गाडे परिवारामधील कोणीही राहुलला ओळखत नाही. मात्र राहुलला गाडे परिवारातील सदस्यांची संपूर्ण माहिती होती. गाडे परिवार धनाढ्य असल्याचे त्याला ठाऊक होते.

आरोपी राहुल हा रांजणगाव येथील दूध डेअरीवर कामाला आहे. त्याच्यावर अनेकांची उधारी आहे. पैशासाठी अनेक जण त्याकडे तगादा लावत होते. पैशे फेडण्यासाठी त्याने चक्क ओळखीच्याच गाडे परिवाराला लुटण्याचा प्लॅन बनवला. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राहुल शहरातील हर्सूल भागात आला. त्याने गाडे यांचे दार ठोठावलं असता गाडे यांच्या लहान मुलाने दरवाजा उघडला त्यावेळी मला गणेश दीक्षित यांनी पाठवलं असे सांगून त्याने घरात प्रवेश केला. व काही मिनिटांतच त्याने गाडे यांच्या मुलावर गावठी रिव्हॉल्वर रोखलं. दरम्यान तेथे गाडे यांच्या पत्नी आल्या त्यांनी आम्ही पैसे देतो, अशी थाप मारत वरील खोलीत घेऊन गेल्या. तोपर्यंत बाजूच्या खोलीत झोपलेले गाडे व त्यांचा लहान मुलगा दोघेही वरील खोलीमध्ये आले. एकाच वेळी चौघांनी आरोपी राहुलवर हल्ला चढवला या हल्ल्यात त्याच्या हातातील रिव्हॉल्वर खाली पडली.

हेही वाचा..सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपासून बिहार पोलीस मुंबईत दाखल होईपर्यंत काय घडलं?

घरातील सदस्यांचा रुद्रावतार पाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाहेर बसलेल्या तरुणांनी त्याला पळताना पकडलं. ही माहिती पोलिसांनी देताच तातडीने हर्सूल पोलिसांनी राहुलला ताब्यात घेत त्याच्या जवळील रिव्हॉल्वर जप्त केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिली.

Published by: Sandip Parolekar
First published: July 29, 2020, 1:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading