07 एप्रिल: जीवनगौरव पुरस्कार सरकार देतं पण त्याची रक्कम मात्र पूर्ण देत नाही असा गंभीर आरोप ज्येष्ठ कलावंत मंगला बनसोडे यांनी केला आहे . मंगला बनसोडे या विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या आहेत .
आतापर्यंत विनोद तावडेंच्या सांस्कृतिक विभागावर करण्यात आलेल्या सर्वात गंभीर आरोपांपैकी हा एक आहे. राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराचे पाच लाख नव्हे तर फक्त चार लाखच मिळतात असा गंभीर आरोप तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी केलाय. त्यांच्या आईच्या नावानेच हा पुरस्कार दिला जातो. कलावंताच्या कष्टाचे पैसे तरी खाऊ नका असं आवाहन बनसोडे यांनी केलंय.
राज्य सरकार खऱ्या तमाशा कलावंताची कदर करत नाही ,गेले आठ महिने झाले राज्य सरकार ने कलावंतांच मानधन दिलेलं नाही. मुद्दा तावडेंच्या कानावर घातला पण त्यांनी हूँ की चू केलं नाही असा गंभीर आरोप ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी केलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Government, Vinod tawade, देवेंद्र फडणवीस, मंगला बनसोडे, राज्यसरकार, विनोद तावडे, सरकार