मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /दोन दिवसांपूर्वी कोरोना टेस्ट निगेटिव्ह, पण आज मृत्यू, पूर्व आफ्रिकेतून आलेल्या 'त्या' व्यक्तीचा मृत्यू

दोन दिवसांपूर्वी कोरोना टेस्ट निगेटिव्ह, पण आज मृत्यू, पूर्व आफ्रिकेतून आलेल्या 'त्या' व्यक्तीचा मृत्यू

सांगली जिल्ह्यातून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पूर्व आफ्रिकेतून आलेल्या एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पूर्व आफ्रिकेतून आलेल्या एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पूर्व आफ्रिकेतून आलेल्या एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे.

सांगली, 9 डिसेंबर : सांगली (Sangli) जिल्ह्यातून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पूर्व आफ्रिकेतून (East Africa) आलेल्या एका रुग्णाचा आज मृत्यू (Death) झाला आहे. या रुग्णावर सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर या रुग्णाला दोन दिवसांपूर्वी मिरज शासकीय कोरोना रुग्णालयात (Miraj Civil Hospital) हलविण्यात आलं होतं. तिथे त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह (Corona Test Negative) आली होती. पण तरीही त्याची प्रकृती गंभीर होती. या व्यक्तीचे स्वॅब काल जीनोम सिक्वेन्सिंगसाठी (Genome Sequencing) पाठविण्यात आले होते. संबंधित मृत रुग्णाने पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातून केनिया-दोहा-मुंबई आणि जत असा प्रवास केल्याचं समोर आलं आहे.

खासगी दवाखान्यात RTPCR चाचणी झालेली नव्हती, प्रशासनाची माहिती

"सदरची व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून आलेली नव्हती तर पूर्व आफ्रिकेतील मलावी या देशातून आलेली होती. या व्यक्तीने मलावी-केनिया-दोहा- मुंबई असा प्रवास केला होता. खासगी दवाखान्यात त्यांची RTPCR चाचणी झालेली नव्हती. त्यामुळे त्यांची काल एकदाच चाचणी झाली. ती चाचणी कोरोना निगेटिव्ह आली होती", अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना नागपुरात काँग्रेसने थेट उमेदवारच बदलला

रुग्णाचे स्वॅब जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले

संबंधित रुग्ण हा काही दिवसांपूर्वी पूर्व आफ्रिकेतून सांगलीत आला होता. सांगलीत आल्यानंतर काही दिवसांनी त्याला थोडा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्याच्यावर सांगलीत एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण तिथे त्या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही. या रुग्णाला दोन दिवसांपूर्वी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याच्यावर उपचार सुरु होते. पण रुग्णाची प्रकृती चिंताजनक होती. रुग्ण व्हेंटिलेटरवर होता. रुग्ण विदेशातून प्रवास करुन आलेला असल्याने शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची आरटीपीआर टेस्ट केली. ती टेस्ट कोरोना निगेटिव्ह आली होती. तरीदेखील त्याचे स्वॅब जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले होते.

प्रशासनाकडून कुटुंबातील पाच आणि इतर 20 जणांचे ट्रेसिंग

राज्य आणि देशावरील कोरोना संकट आणि जगभरात ओमायक्रोन या कोरोनाच्या नव्या विषाणूची असलेली दहशत बघता प्रशासन अधिक सतर्क झालं आहे. प्रशासनाने या रुग्णाच्या संपर्कातील कुटुंबातील पाच सदस्य आणि इतर अप्रत्यक्षपणे संपर्कात आलेले 20 जणांना ट्रेस केलं आहे. सगळ्यांची प्रोटोकॉलनुसार योग्य काळजी घेतली जाणार आहे.

First published: