Home /News /maharashtra /

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या लोकांची पावलं थांबली, समोर होता रक्ताने माखलेला...

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या लोकांची पावलं थांबली, समोर होता रक्ताने माखलेला...

कोणी तरी अज्ञात व्यक्तीने या इसमाच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

    आनिस शेख, प्रतिनिधी देहू रोड, 08 जून :  देहूरोड रेल्वे उड्डाणपुलावर एका अनोळखी 45 वर्षीय इसमाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज पहाटे नेहमी प्रमाणे देहू रोड परिसरातील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडले. रेल्वे उड्डालपुलावरून जात असताना काही नागरिकांना रक्ताने माखलेला एक व्यक्ती आढळून आली. गंभीर अवस्थेत जखमी व्यक्ती विव्हळत होती.  जखमी अवस्थेत त्याची हालचाल होत होती, त्यामुळे नागरिकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. देहुरोड पोलिसांनी  घटना स्थळावर धाव घेतली  आणि  जखमी व्यक्तीला जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. पंरतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हेही वाचा-पुण्यात नव्या आदेशानुसार हे राहणार सुरू आणि बंद ; संपूर्ण यादी कोणी तरी अज्ञात व्यक्तीने या इसमाच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून खुनाचे कारण तसेच आरोपीचा शोध देहूरोड पोलीस घेत आहेत. नागपुरात कुख्यात गुंडाची हत्या दरम्यान, एकापाठोपाठ हत्यांनी नागपूर शहर हादरून गेले आहे. रविवारी संध्याकाळी पारडी परिसरात कुख्यात गुंड प्रदीप उर्फ बाल्या वंजारीची हत्या करण्यात आली. नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुख्य मार्गावरील आठवडी बाजारात  ही घटना घडली.  बाल्याची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरूनच अटक केली आहे. मृतक बाल्या वंजारी हा कुख्यात गुन्हेगार असून पोलिसांनी त्यांना तडीपार देखील केले होते, अशी माहिती पुढे आली आहे. हेही वाचा - रुग्णालयाच्या एका चुकीमुळं आईनं गमावलं आपलं मुलं, कुशीतच होतं लेकरू पण... मृतक बाल्या वंजारी हा परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याचे अनेकांशी वाद वाढले होते.  पारडी मार्गावरील आठवडी बाजार भरला असताना बाल्या त्याठिकाणी असल्याची माहिती समजताच आरोपी नरेंद्र मेहर याने बाल्याला गाठून त्याची निर्घृण हत्या केली. सुमारे महिनाभरापूर्वी मृतक बाल्या आणि आरोपी नरेंद्र मेहर या दोघांमध्ये भांडण झाले होते. त्याच वादाचे रूपांतर बाल्या वंजारीचा हत्येत झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: खून, देहूरोड, हत्या

    पुढील बातम्या