Home /News /maharashtra /

महाराष्ट्र हादरला! पेणमध्ये अडीच वर्षांच्या कोवळ्या जीवावर बलात्कार करुन हत्या

महाराष्ट्र हादरला! पेणमध्ये अडीच वर्षांच्या कोवळ्या जीवावर बलात्कार करुन हत्या

या घटनेमुळे मळेघर वाडीसह परिसरात तणाव निर्माण झाला आहे. त्याचबरोबर पेण ग्रामीण रुग्णालय आणि पेण पोलीस ठाण्यात आदिवासी समाजातील नागरिकांनी गर्दी केली आहे.

    रायगड, 30 डिसेंबर: पेण तालुक्यात (Pen, Raigarh) एका अडीच वर्षांच्या चिमुरडीची बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या (Rape and Murder) केल्याची धक्कादायक तितकीच संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं पेण तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मानवतेला काळिमा फासणारी घटना पेण तालुक्यातील मळेघर वाडी येथे घडली आहे. अडीच वर्षांच्या आदिवासी मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. हेही वाचा...खासदार उदयनराजेंची अशीही जादूची छप्पी, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल पेणच्या ग्रामीण रुग्णालयात तिचा मृतदेह विच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. पेण पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. त्याला आधीही बलात्कारप्रकरणी अटक झाली होती. सध्या तो जामिनावर असून त्यानेच हे संतापजनक कृत्य केल्याचे समजते. पेण पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे मळेघर वाडीसह परिसरात तणाव निर्माण झाला आहे. त्याचबरोबर पेण ग्रामीण रुग्णालय आणि पेण पोलीस ठाण्यात आदिवासी समाजातील नागरिकांनी गर्दी केली आहे. खबरदारी म्हणून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात ही अशीच अत्यंत घृणास्पद घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचे फोटो काढल्याच्या घटनेनं जुन्नर तालुका हादरला आहे. तांबे या पश्चिम पट्ट्यातील, आदिवासी समाजातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या कारणावरून तीन युवकांवर पॉस्को अर्थात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक आणि अनुचित जाती जमाती अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक नराधम फरार आहे. हेही वाचा..कोरोनामुळे आणखी वाढली चिंता! उद्धव ठाकरे सरकारनं घेतला मोठा निर्णय या घटनेनंतर आदिवासी समाज संघटना बिरसा ब्रिगेड आक्रमक झाली आहे. बिरसा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर आंदोलन केलं. या दरम्यान, तांबे गावानं बिरसा ब्रिगेडची दहशत अनुभवल्याचंही बोललं जात आहे. जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांनी दिलेली माहिती अशी की, या प्रकरणी सौरभ भगवान वाळूंज, आदित्य गुलाब कबाडी या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर करण शिवाजी वाळूंज हा आरोपी घटनेनंतर फरार झाला आहे. तिन्ही आरोपी तांबे गावातीलच आहेत.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या