धुळे, 11 जुलै: कोरोनाच्या महासंकटात झालेल्या निर्घृण हत्येनं धुळे शहर हादरलं आहे. एका व्यक्तीची अज्ञातानं दगडानं ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या महाकाली मंदिरा शेजारी या व्यक्तीचा मृतदेह आढळला. हत्येचं गूढ अद्याप उलगडू शकलं नाही.
मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांमुळे हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळूनही पोलीस घटनास्थळी दाखल झाले नाहीत. एक तास उलटून गेल्यावर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिसर सील केला. हत्या झालेल्या व्यक्तीची दुचाकी पुरावे नष्ट करण्याच्या हेतूनं नदीपात्रात फेकून दिली. पोलिसांनी या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
हे वाचा-मुलाच्या मृत्यूचा बापानं घेतला बदला! महिलेचं शीर घेऊन पोहोचला पोलीस ठाण्यात
अद्याप हत्या झालेल्या व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. कोणत्या कारणासाठी हत्या करण्यात याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पहाटे नदी किनारी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना मंदिराशेजारी मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली. व्यक्तीची अज्ञातानं दगडानं ठेचून हत्या केली होती. दरम्यान खून झालेल्या सदर व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून शहरात तर्क वितर्क लावले जात आहेत.