Home /News /maharashtra /

दोन वर्षीय चिमुकलीसह पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या, घटनेने बीड हादरले

दोन वर्षीय चिमुकलीसह पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या, घटनेने बीड हादरले

दोन वर्षीय मुलीसह पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या, घटनेने खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

दोन वर्षीय मुलीसह पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या, घटनेने खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

Wife and daughter killed then man commits suicide: आपल्या पत्नीसह पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बीड, 25 सप्टेंबर : दोन वर्षीय चिमुकलीसह पत्नीची हत्या (Wife and daughter murder) करून इसमाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या (Man commits suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा गावात उघडकीस आली आहे. सिरसाळा गावात मोहा रोड परिसरात रात्री साडेनऊ ते 10 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. गावातील अल्लाबकश शेख याने आपली पत्नी आणि 2 वर्षीय मुलीची गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार प्रथमदर्शनी दिसून आलाय. खून करून पतीने स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान अल्लाबकश याने असं का केलं ? याचा तपास पोलीस करत आहेत. तिन्ही मृतदेह अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर अहवाल आल्यानंतर नातेवाईकांनी तक्रार दिली तर, गुन्हा दाखल होईल अशी माहिती पोलिसांनी दिलीय. दरम्यान या दुर्दैवी आणि क्रूर घटनेने सिरसाळा परिसरात खळबळ उडाली आहे. मुलांच्या निधाननंतर नैराश्येतून पुण्यात वडिलांची आत्महत्या दोन मुलांच्या निधनानंतर नैराश्येत असलेल्या वडिलांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेड फाटा येथे ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. 40 वर्षीय वडिलांनी राहत्या घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सिंहगड रोड परिसरात राहणारे संजीव कदम यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. संजीव कदम यांनी नैराश्येतून हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी संजीव कदम यांचा एक मुलगा आणि मुलीचं आजारपणामुळे निधन झालं होतं. संजीव कदम यांचा मुलगा 14 वर्षांचा होता तर मुलगी ही 10 वर्षांची होती. दोन्ही मुलांचे काही दिवसांपूर्वी थोड्या-थोड्या दिवसांच्या अंतराने आजारपणामुळे निधन झाले होते. दोन्ही मुलांच्या निधानानंतर संजीव कदम हे नैराश्येत गेले होते. वारंवार दूध मागतो म्हणून चिडून मुलाला उचलून आपटलं एक निरागस बाळ वारंवार आईकडे दूध पिण्याचा आग्रह करत होते. यामुळे संतप्त झालेल्या क्रूर आईनं मुलाला पकडून जमिनीवर जोरात आपटले, ज्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना छत्तीसगडच्या कोरबा येथील बालकानगर परिसरातील आहे. प्रमिला असे या क्रूर मातेचे नाव असून या तीन वर्षांच्या मुलाचे सात्विक राव असे नाव होते. सात्विक हा आई प्रमिलाकडून वारंवार दूध पिण्याचा आग्रह करत होता. या क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात प्रमिलानं केलेल्या कृत्यामुळे निरागस मुलाला प्राणाला मुकावे लागले, आई इतकी निष्ठूर कशी झाली, अशी चर्चा परिसरात आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Beed, Crime, Suicide

पुढील बातम्या