यवतमाळ, 02 एप्रिल : यवतमाळमध्ये उत्सवात फलक लावण्यावरून झालेल्या वादात एकावर चाकूने वार करण्यात आले. फलक फाडून शेजाऱ्याला शिवीगाळही करण्यात आली. यातून झालेल्या वादात तरुणावर चाकूने पाठीत वार करण्यात आले. तेव्हा तरुणाने चाकू तसाच हाताने धरल्यानं हल्ला करणाऱ्याला पुन्हा वार करता आला नाही. दरम्यान इतर लोक आल्याने हल्लेखोर पळून गेला. यानंतर जखमी तरुण शरिरात खुपसलेल्या चाकूसह तसाच रुग्णालयात दाखल झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रामनगर लोहारा इथं राहणारा दीक्षित विजय हिरणवाडे हा परिसरात मोलमजुरी करतो. रामनवमीच्या उत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या फलकावरून वाद झाला. उत्सवासाठी लावलेला फलक फाडण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता. तेव्हा दीक्षित घरात जेवत होता. त्याला हल्लेखोरांनी बाहेर बोलावले. नेमकं काय झालं याची कल्पना नसल्याने त्याबद्दल विचारत असतानाच हल्लेखोरांनी त्याच्यावर वार केला. त्याच्या पाठीत चाकू खुपसण्यात आला.
विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करून व्हिडिओ केला अन्…, अमरावतीमधील खळबळजनक घटना
दीक्षितने त्याच्या पाठीत वार केलेला चाकू तसाच हाताने धरून ठेवला. यामुळे हल्लेखोराला पुन्हा वार करण्याची संधी मिळाली नाही. तेव्हा झालेल्या गोंधळानंतर आजूबाजूचे लोक बाहेर आले. त्यांना पाहताच हल्लेखोरांनी तिथून काढता पाय घेतला. हल्ल्यात जखमी झालेल्या दीक्षितला दुचाकीवरून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या पाठीत खुपसलेला चाकू शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime