नाशिक, 20 एप्रिल : लग्नापूर्वीच नवरदेवानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. संसार सुरू होण्यापूर्वीच राजाराणीच्या संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. निखिल प्रकाश देशमुख (वय 30 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.
हळदीच्या पूर्वसंधेला निखिलनं फ्लॅटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. गंगापूर रोडवरील बळवंतनगर येथे गुरूवारी (18 एप्रिल) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. शनिवारी (20 एप्रिल) निखिलचं लग्न होणार होतं. दरम्यान, व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्यानं त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. निखिलच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटीतील हिरावाडी येथील निखिल रहिवासी होता. गुरुवारी संध्याकाळी तो घराबाहेर पडला. यानंतर रात्री बराच उशीर झाल्यानंतर तो घरी न परतल्यानं कुटुंबीयांची चिंता वाढली. यानंतर निखिलच्या शोधासाठी प्रत्येकजण धावपळ करू लागला. यादरम्यानच, गंगापूर रोडवरच्या देशमुख कुटुंबीयांच्याच एका फ्लॅटमध्ये निखिलचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे निखिलच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे.
वाचा अन्य बातम्या
कांचन कूल यांनी सांगितला निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा, पाहा VIDEO
क्रूरतेचा कळस, विद्यार्थिनीला जिवंत जाळून झाडाला टांगले
VIDEO: रावसाहेब दानवे माझी मेहबूबा: अर्जुन खोतकर
VIDEO : प्रकाश आंबेडकरांची राज ठाकरेंवर सडकून टीका, म्हणाले...