मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धावत्या एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न भोवला; तोल गेला अन्..., पनवेल स्टेशनवरील घटनेचा Video

धावत्या एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न भोवला; तोल गेला अन्..., पनवेल स्टेशनवरील घटनेचा Video

या घटनेत धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीसोबत जे काही घडलं ते काळजाचा ठोका चुकवणारं होतं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

वसीम अन्सारी, मुंबई 03 ऑक्टोबर : रेल्वे स्टेशनवरील अनेक घटना समोर येत असतात. ज्यात धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसोबत मोठी दुर्घटना झाल्याचंही पाहायला मिळतं. या घटना स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होतात आणि त्याचे व्हिडिओ व्हायरलही होतात. मात्र, तरीही यातून धडा घेणारे फार कमी लोक असतात. याचाच प्रत्यय देणारी एक घटना पनवेल स्टेशनवरून समोर आली आहे.

स्टेजवर हनुमानाची भूमिका साकारत असतानाच मृत्यूने गाठलं, हृदयद्रावक घटना कॅमेऱ्यात कैद, VIDEO

या घटनेत धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीसोबत जे काही घडलं ते काळजाचा ठोका चुकवणारं होतं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेत पनवेल स्टेशनवर एक व्यक्ती धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात खाली कोसळला. मात्र, सुदैवाने आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे या व्यक्तीचा जीव वाचला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती नेत्रवती एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. घटनेचा व्हिडिओ समोर आला असून व्हिडिओमध्ये दिसतं, की पनवेल स्टेशनवरुन एक्सप्रेस निघाली आहे. इतक्यात एक व्यक्ती भरपूर बॅग घेऊन ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्मवर धावू लागतो. थोडावेळ धावल्यानंतर तो ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ट्रेनचं स्पीड अधिक असल्याने त्याला हे शक्य होत नाही.

Video : 50 जणांमध्ये कॅमेऱ्याची नजर त्याच्यावरच, गरबा खेळता खेळता कोसळला अन् मृत्यू

ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल जातो आणि तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत अडकतो. सुदैवाने जवळच उभा असलेल्या आरपीएफ जवानाने क्षणाचााही विलंब न करता धाव घेतली आणि या व्यक्तीला बाजूला खेचत ट्रेनखाली जाण्यापासून वाचवलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिओ थरकाप उडवणारा आहे.

First published:

Tags: Shocking video viral, Train