मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंपले गोळा करणे बेतले जीवावर; खवळलेल्या समुद्रात बुडून मच्छिमाराचा मृत्यू

शिंपले गोळा करणे बेतले जीवावर; खवळलेल्या समुद्रात बुडून मच्छिमाराचा मृत्यू

Fisherman drowns in Raigad Alibaug: अलिबाग येथे एक मच्छिमार वाहून गेल्याची घटना घडली आहे. या मच्छिमाराचा मृतदेह किनाऱ्यावर आढळून आला आहे.

Fisherman drowns in Raigad Alibaug: अलिबाग येथे एक मच्छिमार वाहून गेल्याची घटना घडली आहे. या मच्छिमाराचा मृतदेह किनाऱ्यावर आढळून आला आहे.

Fisherman drowns in Raigad Alibaug: अलिबाग येथे एक मच्छिमार वाहून गेल्याची घटना घडली आहे. या मच्छिमाराचा मृतदेह किनाऱ्यावर आढळून आला आहे.

अलिबाग, 9 जून : कोकणातील रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यांत जोरदार पाऊस (Heavy rain) पडत आहे. तसेच पुढील चार दिवस सुद्धा मुसळधार (Heavy rainfall) ते अतिमुसळधार पाऊस (Extremely Heavy Rainfall) पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना तसेच इतर नागरिकांनाही समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केलं होतं. मात्र, असे असतानाही मच्छिमार (Fisherman) समुद्रात शिंपले गोळा करण्यासाठी गेला आणि आपले प्राण गमावले.

अलिबाग येथे एक मच्छिमार वाहून गेल्याची घटना आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. जेएसएम कॉलेजच्या मागे त्याचा मृतदेह आढळून आला आहे. दिनेश हरी राक्षीकर असे त्याचे नाव आहे. अलिबाग कोळीवाडा येथे राहणारा दिनेश राक्षीकर हा आज कुलाबा किल्ल्याजवळच्या कातळावर खुब्या काढायला गेला होता. भरतीचे पाणी वाढल्याचे लक्षात आले नाही, त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला. त्याचा मृतदेह जेएसएम कॉलेजच्या मागील किनार्‍यावर लागला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकणात NDRFच्या 15 टीम तैनात

दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. असे असतानाही मच्छी, शिंपले मिळवण्यासाठी दिनेश गेला आणि जीव गमावून बसला. शिंपले गोळा करण्यासाठी तो समुद्राच्या खडकावर गेला होता. दुपारी समुद्राच भरती असल्यामुळे तो बुडाला, या तरुणांचा शोध घेतल्याने संध्याकाळी उशिरा त्याचा मृतदेह आढळून आला.

रत्नागिरीत पाच दिवस ऑरेंज अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यात 9 जून ते 13 जून या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्यातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, या सर्व कालावधीत रत्नागिरीसह लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून सोबतच मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पुढील आठवडाभर अतिमुसळधार पावसाचा अंदाज; पाहा कुठल्या जिल्ह्यात जोरदार बरसणार

जळगावात वीज कोसळून दोघांचा मृत्यू

शेतातून घरी परतत असताना अंगावर वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात असलेल्या तळई गावात ठरावीक अंतराने या दोन दुर्दैवी घटना घडल्या. मृतांमध्ये तरुणासह प्रौढाचा समावेश आहे. भूषण अनिल पाटील (वय 18) आणि विक्रम दौलत चौधरी (वय 57) अशी मृतांची नावे असून, दोघेही तळई गावातील रहिवासी होते.

विक्रम चौधरी व भूषण पाटील हे दोघे जण शेतात गेलेले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तळई शिवारात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे ते घरी परत येत होते. अंगावर वीज पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. दोन वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या. त्यामुळे तळई गावावर एकच शोककळा पसरली आहे.

First published:

Tags: Raigad