गोंदिया 02 सप्टेंबर : कुटुंबासोबत गणपती विसर्जनासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 38 वर्षीय व्यक्तीचा मामा तलावात बुडून मृत्यु झाला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील डूग्गीपारजवळ ही घटना घडली. सतीश गोपाल कुरसुंगे वय 38 वर्षे असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
सतीश आपल्या घरातील काही महिलांसह गणपती विसर्जन करण्याकरता मामा तलाव येथे गेला होता. मामा तलावावर विसर्जन सुरू असताना सतीश कुरसुंगे हा पोहण्यासाठी तलावात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.
सतीश कुरसुंगेला शोधण्यासाठी गोंदियावरून शोध आणि बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, तलावाच्या पाण्याची पातळी खोल असल्याने त्याचा मृतदेह आढळला नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी शोध मोहीम सुरू केली असता शोध आणि बचाव पथकाला त्याचा मृतदेह मिळाला. त्याचा मृतदेह सदर तलावातून बाहेर काढण्यास यश आलं आहे. मृतदेह सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
गणरायाच्या आगमनाआधीच घेतला जगाचा निरोप; डेकोरेशन करत असतानाच तरुणाचा मृत्यू
डेकोरेशन करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू
रत्नागिरीमधूनही नुकतंच एक हृदयद्रावक घटना समोर आली होती. यात गणरायाच्या आगमनाच्या आदल्या रात्री रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील आयनी गावात मोठी दुर्घटना घडली. गणरायाच्या आगमनाच्या पूर्वतयारीला डेकोरेशन करत असताना आयनी घागुर्डेवाडी येथील 30 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. विजेचा शॉक लागून या युवकाचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhandara Gondiya, Shocking news