Home /News /maharashtra /

हृदयद्रावक ! 'मला माफ करा' म्हणत पतीची आत्महत्या; धक्क्याने पत्नीचाही मृत्यू, पनवेलमधील घटना

हृदयद्रावक ! 'मला माफ करा' म्हणत पतीची आत्महत्या; धक्क्याने पत्नीचाही मृत्यू, पनवेलमधील घटना

हृदयद्रावक ! 'मला माफ करा' म्हणत पतीची आत्महत्या; धक्क्याने पत्नीचाही मृत्यू, पनवेलमधील घटना (प्रातिनिधिक फोटो)

हृदयद्रावक ! 'मला माफ करा' म्हणत पतीची आत्महत्या; धक्क्याने पत्नीचाही मृत्यू, पनवेलमधील घटना (प्रातिनिधिक फोटो)

Crime News: महाराष्ट्रातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पतीच्या आत्महत्येच्या धक्क्याने पत्नीचाही मृत्यू झाला आहे.

    नवी मुंबई, 11 नोव्हेंबर : पनवेल शहरातून (Panvel) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आर्थिक चणचणीमुळे घरातील कमवत्या पुरुषाने टोकाचं पाऊल उचलंत आपलं आयुष्य संपवलं (man commits suicide). पतीचा मृत्यू झाल्याचा पत्नीला इतका मोठा धक्का बसला की, त्यात महिलेचाही मृत्यू (wife died due to heart attack) झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पनवेल येथील रोडपाली परिसरात संदीप कुलपे हे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास होते. त्यांची आर्थिक परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून खूपच हालाकीची झाली होती. संदीप यांच्या पत्नी घरगुती क्लासेस घेत होत्या. त्यांना दोन मुली आहेत. आर्थिक परिस्थिती हालाकीची असतानाच पत्नी आजारी पडली त्यामुळे खर्च अधिक झाला. या नंतर नैराश्येत गेलेल्या संदीप कुलपे यांनी टोकाचं पाऊल उचलंत आआत्महत्य केल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात सकाळने वृत्त दिलं आहे. संदीप यांना दोन मुली आहेत. त्यापैकी एक मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे तर दुसरी मुलगी शाळेत आहे. संदीप 7 नोव्हेंबर रोजी कामासाठी घराबाहेर गेले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी परतत असताना आपल्या कुटुंबीयांना एक मेसेज केला. मला माफ करा असा मेसेज त्यांनी केला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी खारघर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मोबाइल लोकेशनच्या सहय्याने परिसरात शोध घेतला. यावेळी खारघर परिसरात संदीप यांचा मृतदेह आढळून आला. संदीप यांच्या मृत्यूचा पत्नी साक्षी यांनाही मोठा धक्का बसला. संदीप यांच्यावर अंत्यसंस्कार करुन आल्यावर साक्षी यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर साक्षी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ह्रदयविकाराचा झटका आल्याने साक्षी यांचाही मृत्यू झाला. पती आणि पत्नीच्या या निधानाने सर्वांनाच धक्का बसला असून परिसरात शोककळा पसरली आहे. कारमध्ये हवा भरणं पडलं एक लाखाला हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका शिक्षकाला कारमध्ये हवा भरणं चांगलंच महागात पडलं आहे. कारच्या चाकात हवा भरेपर्यंत कारमधील 1 लाख रुपयांची रक्कम अज्ञातानं पळवली . कारच्या चाकात हवा भरल्यानंतर, कारमधील रक्कम गायब असल्याचं पाहून संबंधित शिक्षकाला देखील धक्का बसला आहे. या प्रकरणी पीडित शिक्षकाने वसमत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे येथील रहिवासी असणारे शिक्षक शिंदे यांनी वसमत येथील एका बँकेतून 1 लाख रुपयांची रक्कम काढली होती. त्यानी एक लाखाची रक्कम एका पिशवीत ठेवून ही पिशवी आपल्या कारमध्ये ठेवली होती. रक्कम घेऊन घरी परत जात असताना, त्यांनी वसमत शहरातील ठक्कर कॉलनी परिसरात चाकांत हवा भरण्यासाठी कार उभी केली.
    First published:

    Tags: Crime, Panvel, Suicide

    पुढील बातम्या