Home /News /maharashtra /

2 बायका अन् घरात रक्ताचा सडा, पहिल्या पत्नीच्या मदतीने सवतीचा आणि मुलीचा केला निर्घृण खून, जालना हादरलं

2 बायका अन् घरात रक्ताचा सडा, पहिल्या पत्नीच्या मदतीने सवतीचा आणि मुलीचा केला निर्घृण खून, जालना हादरलं

मयत महिलेचा पती गणेश सातारे यास दोन पत्नी असून दोघी एकाच घरात राहत होत्या. एक पत्नी वरच्या मजल्यावर आणि मयत भारती या तळमजल्यावर राहात होती.

जालना, 16 मे : दोन बायका असलेल्या एका नवऱ्याने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पहिल्या पत्नीच्या मदतीने सवतीचा आणि मुलीचा निर्घृणपणे खून (murder) केल्याची खळबळजनक घटना जालना (jalana) शहरातील रेल्वेस्थानकाजवळील सोनलनगर भागात उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,   भारती गणेश सातारे ( वय 36) आणि  मुलगी वर्षा गणेश सातारे  (वय 17) असं मयत मायलेकीचं नाव आहे. या दोघी मायलेकींचे मृतदेह आज सकाळी त्यांच्या राहत्या घरात आढळून आले.  घटनेची माहिती कळताच कदीम जालना पोलीस तातडीने घटनास्थली दाखल झाले. दोघी मायलेकीचे मृतदेह  जिल्हा सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले आहेत. या दोघी मायलेकीच्या निर्दयी खूनामुळे सोनलनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून हा खून गणेश सातारे यानेच आपल्या पहिल्या पत्नी आणि मुलाच्या मदतीने केल्याचे प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न झाले आहे. (OMG! पगारात रोख रक्कम नाही तर 'सोनं' ऑफर करते ही कंपनी; काय आहे यामागील कारण?) मयत महिलेचा पती गणेश सातारे यास दोन पत्नी असून दोघी एकाच घरात राहत होत्या. एक पत्नी वरच्या मजल्यावर आणि मयत भारती या तळमजल्यावर राहात होती. पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले असून याप्रकरणी कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.  मयत भारती सातारे यांच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात मारहाणीचे घाव आणि जखमांच्या खुणा असून अंगावर रक्त गोठवलेल्या स्थितीत असल्यामुळे ही घटना पहाटेपूर्वी घडली असावी, असा अंदाज आहे.  या दोघी मायलेकीचा खून कौटुंबिक वादातून झाला असल्याची संशय आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. पती, सवत आणि मुलाविरुद्ध गुन्हा दाखल दरम्यान, याप्रकरणी मयत भारती सातारे यांची बहीण पंचशीला पांडुरंग कदम यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत भारती सातारे आणि मुलगी वर्षा सातारे यांना चारित्र्यावर संशय घेऊन तिचा पती गणेश उर्फ संजू सातारे, सवत सीमा सातारे, सवतीचा 16 वर्षाचा मुलगा या तीन जणांनी बेदम मारहाण केली होती. गेल्या 15 दिवसांपासून आणि काल रात्रभर सुरू असलेल्या या मारहाणीतच त्या दोघी मायलेकीचा मृत्यू झाला. मयत भारती ही गणेश सातारे याची दुसरी पत्नी होती, तिचे पूर्वी लग्न झालेले होते. (आजीबाईंच्या एका एका उडीने वाढवली हृदयाची धडधड; वृद्धेचा जबरदस्त Skipping Video) पहिल्या पतीपासून तिला दोन मुली झालेल्या असून, एकीचे लग्न झालेले आहे, तर दुसरी मुलगी मयत वर्षा ही होती. मयत भारती यांचे गणेश सातारे याच्यासोबत लग्नापूर्वीपासूनच प्रेमसंबंध असल्याचे समजल्याने त्यांच्यापासून पहिल्या पतीने १५ वर्षांपूर्वीच काडीमोड घेतला होता.  त्यानंतर गणेश सातारे याने भारती यांच्यासोबत त्यांची दुसरी मुलगी वर्षा हिच्यासह स्वीकार करून दुसरे लग्न केले होते, हे लग्न आंतरजातीय होते. मयत भारती यांना गणेश सातारे याच्यापासून झालेला एक मुलगा असून, तो 8 वर्षाचा आहे.   याप्रकरणी आरोपी गणेश उर्फ संजू सातारे, त्याची पहिली पत्नी सीमा सातारे आणि १६ वर्षाचा मुलगा, आशा तीन जणांविरुद्ध भादंवि. 302, 34 कलमान्वये गुन्हा दाखल करून, त्यांना ताब्यात घेतले आहे. मयत मायलेकीवर रामतीर्थ स्मशानभूमीत पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या