अमानुषतेचा कळस! पालघरमध्ये 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला बेड्या

अमानुषतेचा कळस! पालघरमध्ये 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला बेड्या

या प्रकरणी पोलिसांत तक्रर दाखल केल्यानंतर 72 तासांत या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

  • Share this:

पालघर, 10 ऑक्टोबर : हाथरस प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान पालघरमध्ये झालेल्या 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला होता. बुधवारी 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपीला पकडलं आहे. हा आरोपी कॉन्ट्रॅक्टर असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील मोखाडा परिसरात आरोपी लहान मुलगी घरात एकटी असल्याचं पाहून आत शिरला आणि तिच्यावर जबरदस्ती करू लागला. घरात कोणी नाही याचा फायदा घेऊन त्याने बलात्कार केला आणि घटनास्थळावरून फरार झाला.

हे वाचा- धक्कादायक! बारामतीमध्ये सावत्र बापाचा नऊ वर्षीय बालिकेवर बलात्कार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेदरम्यान पीडितेचा भाऊ घरी आला तेव्हा त्याने हा प्रकार पाहिला आणि आरोपीला रंगेहाथ पकडलं. मदतीसाठी आरडा-ओरडा केला तेव्हा आरोपी पीडितेच्या भावाला ढकलून फरार झाला होता. त्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली होती.

या प्रकरणी पोलिसांत तक्रर दाखल केल्यानंतर 72 तासांत या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तालुक्यात बारामतीमध्ये शुक्रवारी सावत्र वडिलांनी आपल्या मुलीवर बलात्कार केल्यानं मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वडिलांना बेड्या ठोकल्याची माहिती मिळाली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 10, 2020, 7:41 AM IST

ताज्या बातम्या