Home /News /maharashtra /

मामलेदार मिसळचे मालक लक्ष्मण मुरुडेश्वर यांचे निधन

मामलेदार मिसळचे मालक लक्ष्मण मुरुडेश्वर यांचे निधन

ठाणे(Thane) स्टेशन परिसरात जिल्हा परिषद कार्यालयाजवळ एका छोट्याश्या खोपट्यामध्ये मुरडेश्वर यांनी मामलेदार मिसळीला सुरुवात केली होती.

ठाणे, 01 डिसेंबर : झणझणीत आणि लालभडक तर्री असलेली मिसळ सातासमुद्रापार पोहोचवणारे ठाण्याचे प्रसिद्ध मामलेदार मिसळचे (mamledar misal) मालक लक्ष्मण मुरडेश्वर (Laxman Murudeshwar) यांचं निधन झालं आहे. ते 84 वर्षांचे होते. कोरोनाची लागण झाल्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज ठाण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ठाणे म्हणजे तलावांचे शहर जशी ओळख तशीच ठाणे म्हणजे मामलेदारची मिसळ अशी ओळख या शहराला मिळाला होती. ठाणे स्टेशन परिसरात जिल्हा परिषद कार्यालयाजवळ एका छोट्याश्या खोपट्यामध्ये मुरडेश्वर यांनी मामलेदार मिसळीला सुरुवात केली होती. IND vs AUS : फिट झाला तरी रोहितला दोनच टेस्ट खेळता येणार, कारण... 1992 साली ठाण्यातील मामलेदार कचेरीबाहेर असलेली कॅन्टीन ही नरसिंह मुरुडेश्वर यांना 99 वर्षांच्या करारावर मिळाली होती. अवघ्या 50 स्क्वेअरफुटांच्या जागेतून सुरू झालेला हे छोटेखानी हॉटेल आता 500 स्क्वेअरफुटाच्या जागेत गेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खवय्यांना मामलेदारच्या मिसळने भुरळ घातली आहे. वडील नरसिंह मुर्डेश्वर  यांच्या पश्चात लक्ष्मणशेठ यांनी नरसिंह मुर्डेश्वर यांची परंपरा अखंडीत सुरू ठेवली. गेली अनेक वर्षे ते मिसळच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करता खवय्यांची सेवा करीत होते. मामलेदार कॅन्टीनमध्ये दिवस पहाटे चारला सुरू होतो, कँन्टीन जवळपास सातला सुरू होते आणि रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असते. रोज जवळपास 3 ते 4 हजार ग्राहक मिसळ खाऊन जातात. शनिवारी-रविवारी हा आकडा पाच हजारांच्या पुढे जातो. आतापर्यंत 16 ठिकाणी मामलेदार मिसळीच्या फ्रँचाईजी सुरू झाल्या आहेत. एवढंच नाहीतर मामलेदारची मिसळ मंत्रालयातून, जेट एअरवेजसारख्या कंपन्यातून महिन्यातून एकदा तरी मागवली जाते. खास पुणेकर ग्राहक सुद्धा आवर्जुन मामलेदार मिसळ खाण्यासाठी येत असता आणि जाताना सोबत पार्सल सुद्धा घेऊन जातात. पुण्यात सुद्धा मामलेदारची मिसळीच्या फ्रँचाईजी देण्यात आल्या आहेत. मामलेदारची मिसळ खाण्यासाठी स्थानिकच नाहीतर राजकीय आणि परदेशातील नागरिक सुद्धा येत असतात. विधानसभा निवडणुकीच्या काळात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला मुलगा अमित ठाकरे यांच्यासह येऊन मामलेदार मिसळीवर ताव मारला होता. ऊर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश, रश्मी ठाकरेंच्या हस्ते बांधले शिवबंधन गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण मुरडेश्वर यांची प्रकृती खालावली होती. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्यावर ठाण्यातील कौशल्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. सोमवारपर्यंत ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. मात्र, मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, सून आणि नातंवडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे ठाण्यातील व्यापाऱ्यांवर शोककळा पसरली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या