Home /News /maharashtra /

Corona Update कोल्हापूर जिल्ह्याची स्थिती गंभीर, रविवारी 1500 वर रुग्ण 65 मृत्यू

Corona Update कोल्हापूर जिल्ह्याची स्थिती गंभीर, रविवारी 1500 वर रुग्ण 65 मृत्यू

कोल्हापूरनं राज्याच्या चिंता वाढवल्या आहेत. रविवारीही 1100 पेक्षा अधिक रुग्ण आणि 50 पेक्षा अधिक मृत्यू अशी स्थिती कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाली.

    मुंबई, 13 जून : राज्यातील कोरोना (Coronavirus)  रुग्णांचा आकडा कमी होण्याचा वेग मंदावला आहे. रविवारीही (Sunday 13th June)  जवळपास शनिवार एवढेच नवे रुग्ण आढळून आले. रुग्ण बरं होण्याची संख्या मात्र घटली आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची वाढलेली रुग्णसंख्या अडचणीचा विषय ठरली आहे. विशेषतः कोल्हापूरनं (Kolhapur) राज्याच्या चिंता वाढवल्या आहेत. रविवारीही 1500 पेक्षा अधिक रुग्ण आणि 65 मृत्यू अशी स्थिती कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाली. (वाचा - महाराष्ट्रातील 'हा' जिल्हा झाला कोरोनामुक्त; सक्रिय रुग्णसंख्या शून्य ) संपूर्ण राज्याचा विचार करता रविवारी राज्यात कोरोनाचे नवे 10442 रुग्ण आढळून आले. तर दिवसभरामध्ये कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा आकडा हा 7504 एवढा राहिला. कोरोनामुळं झालेल्या मृत्यूंचा राज्यातील आकडा 483 वर गेला आहे. चिंतेची बाब म्हणजे कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचा राज्यातील दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दीड टक्क्याच्या जवपास असलेला मृत्यूदर दोन टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे. (वाचा-पुण्यात उद्यापासून 7 ते 7; निर्बंध आणखी शिथिल, नव्या नियमावलीनुसार काय होणार बदल) राज्यातील कोल्हापूर हा जिल्हा प्रशासनासमोर काळजीचं कारण बनला आहे. रविवारचा विचार करता, कोल्हापुरात मनपा आणि जिलह्याची एकूण रुग्णसंख्या  1500 च्या वर तर मृतांचा आकडा 65 होता. कोल्हापूरशिवाय अहमदनगर आणि पालघर इथला मृतांचा आकडा मोठा राहिला. पालघरमध्ये 53 तर अहमदनगरमध्ये दिवसभरात 40 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परिणामी मृत्यूचा राज्यातला दर वाढत आहे. मुंबईमध्ये राज्यात 24 तासांतीन नव्या कोरोना रुग्णांचा आकडा हा 700 वर आला आहे. त्यामुळं मुंबईतला आकडा कमी होत आहे. मुंबईत 15 हजाराच्या वर अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळं कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उतरता क्रम असला तरी काही जिल्ह्यांमध्ये आकडे पुन्हा हृदयाचे ठोके वाढवत आहेत. कोल्हापूरसाठी तर सरकारनंही आता गांभीर्यानं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळं कोरोनाच्या या परिस्थितीत सर्वांनीच अत्यंत सावधपणे वागत स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या