मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मालवणात तब्बल 25 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त, 9 जण ताब्यात

मालवणात तब्बल 25 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त, 9 जण ताब्यात

व्हेल माशाची उलटी जप्त

व्हेल माशाची उलटी जप्त

व्हेल माशाची उलटी म्हणजे अंबरग्रीस ही अतिशय सुगंधी असते. अंबर ग्रीसला ‘समुद्रातील तरंगते सोने’ असेही म्हटले जाते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मालवण, 18 मार्च : मसुरे वेरळ येथील माळरानावर व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. या  अंबर ग्रीसची किंमत तब्बल 25 कोटी रूपये इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने ही धडक कारवाई केली. व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी पोलिसांनी नऊ संशयितांना पकडले आहे.

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने  केलेल्या या कारवाईत २४ किलो २६४ ग्रॅम वजनाच्या व्हेल मासा उलटी (अंबर ग्रीस) सापडली. याशिवाय दोन चारचाकी गाड्या व एक दुचाकी असा सुमारे २५ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. व्हेल माशाची उलटी एवढ्या मोठ्या प्रमाणात जप्त करण्याची ही सिंधुदुर्गातील पहिलीच कारवाई आहे.

व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी काही जण येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल आणि अप्पर पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने ही धडक कारवाई केली.

पुष्पाचा भाऊ! नकली अंडे का फंडा, दारूची तस्करीसाठी लढवली शक्कल; आरोपींना अटक

१० फेब्रुवारीला १८ किलो उलटीसदृश्य पदार्थ जप्त

याआधी तळाशील समुद्र किनाऱ्यावरून एकूण २७ लहान-मोठ्या आकाराचे सुमारे १८ किलो ६०० ग्रॅमचे उलटीसदृश पदार्थाचे तुकडे जप्त करण्यात आले होते.१० फेब्रुवारीला पोलिसांनी ही कारवाई केली होती. आता पुन्हा तालुक्यातच मोठ्या प्रमाणात उलटीसदृश पदार्थाचे तुकडे जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.

समुद्रातलं तरंगतं सोनं

व्हेल माशाची उलटी म्हणजे अंबरग्रीस ही अतिशय सुगंधी असते. जगभरात या उलटीला मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला मोठी किंमत मिळते. अंबर ग्रीसला ‘समुद्रातील तरंगते सोने’ असेही म्हटले जाते. यापूर्वी, देवगड तालुक्यातील तारामुंबरी, तर मालवणातील देवबाग समुद्र किनारी सापडलेली देवमाशाची उलटी स्थानिक मच्छीमारांनी वन विभागाच्या ताब्यात दिली होती.

First published:

Tags: Sindhudurg