विशाल रेवडेकर; सिंधुदुर्ग, 16 ऑक्टोंबर : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटावर शिंदे गटाकडून टीका करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान सांगोला मतदार संघाचे आमदार शहाजीबापू पाटील हे कोकण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर सडकून टीका केली. या टीकेला कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. तसेच नाईक यांनी राणे पिता पुत्रांचाही चांगलाच समाचार घेतला. शहाजीबापू पाटलांना कोकणचा इतिहास माहिती नसल्याचे म्हणत जोरदार टीका केली.
वैभव नाईक म्हणाले कि, आमदार शहाजी पाटलांना कोकणचा इतिहास माहिती नाही. या मतदार संघात निलेश राणे पुन्हा खासदार होतील याची तुम्ही स्वप्ने बघावी. मी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पराभव केला आहे. त्यामुळे निलेश राणे पुन्हा ही निवडणूक लढण्याची हिम्मत करणार नाहीत. तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या भेटीसदर्भात बोलताना नाईक म्हणाले कि, एकमेकमेकांवर टीका करणारे आज कोणत्या कारणासाठी एकत्र आले याचे उत्तर राणे पिता पुत्रांनी द्यावे असेही नाईक म्हणाले.
हे ही वाचा : पावसाने पवारसाहेबांना साथ दिली, अन् मला..., अजितदादांच्या टोलेबाजीने एकच हश्शा, VIDEO
काय म्हणाले होते शहाजीबापू पाटील
खासदारकीच्या निवडणुकीत कोकणात मी स्वतः येणार असा शब्द माजी खासदार निलेश राणे यांना शहाजीबापू पाटील यांनी दिला. कोकणात येऊन धुरळा पाडतो, कारण या दोन राऊतांवर माझा लय राग आहे, त्यांनी आमचं लय वाटोळं केलंय. त्यामुळे तुम्ही कितीही येऊ नका असं म्हटलं तरी मी इथे येणारच.
संजय राऊत आता कुठे उभे राहणार नाहीत. ते कुठे उभे राहिले असते, तर मी तिथेही गेलो असतो. त्या दोन्ही राऊतांनी सगळं आमचं वाटोळ करून टाकलं असल्याचं वक्तव्य एका खाजगी कार्यक्रमात शहाजीबापू पाटील यांनी केलं. आणि उद्याचे कोकणातील खासदार निलेश राणे दिल्लीत जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा : प्रिय मित्र, देवेंद्र, 'हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीशी सुसंगत' राज ठाकरेंनी काय लिहिलं पत्रात?
नारायण राणे यांच्या जीवनातील संघर्ष, निलेश राणे तुमच्याही जीवनात आणि माझ्याही जीवनात आला नसल्याचं वक्तव्य शहाजीबापू पाटील यांनी केलं. संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे, नारायण राणे, एकनाथ शिंदे. एकेकाळी स. का. पाटील हे नाव राजकारणात खूप मोठं होतं. त्याच स.का. पाटलांची सभा जर कोणी उधारी असेल तर त्याचं नाव आहे. नारायण राणे यांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ कोकणात रोवली आणि भगवा झेंडा संपूर्ण कोकणात फिरवला. नारायण राणेंना स्वतःचा जीव धोक्यात घालूनसुद्धा अनेक वेळा हे काम करावं लागलं.", असंही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narayan rane, Sindhudurg, Sindhudurg news