Home /News /maharashtra /

भावाचं प्रेम मृत्यूपर्यंत घेऊन गेलं, एक भाऊ पाण्यात पडला म्हणून दुसऱ्याने घेतली उडी आणि...

भावाचं प्रेम मृत्यूपर्यंत घेऊन गेलं, एक भाऊ पाण्यात पडला म्हणून दुसऱ्याने घेतली उडी आणि...

मालेगावमधून एक काळीज पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे.

    मालेगाव, 3 एप्रिल : कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग-धंदे सध्या ठप्प आहेत. मात्र सर्वांना जगण्यासाठी ज्या अन्न-धान्याची गरज असते तो पिकवणारा शेती व्यवसाय अजूनही सुरू आहे. अशातच मालेगावमधून एक काळीज पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. मालेगावच्या रामपूर इथं ही घटना घडली. किशोर सोनवणे व मुरलीधर सोनवणे असे मृत्यू झालेल्या या भावंडांची नावे आहेत. हेही वाचा- कोरोनाच्या संशयानं केला प्रेमाचा शेवट; वॉर्ड बॉयकडून डॉक्टर प्रेयसीची हत्या पाय घसरून एक भाऊ शेततळ्यात पडल्यानंतर त्याला वाचविण्याचासाठी दुसऱ्याने उडी घेतली. मात्र पोहोता येत नसल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही बातमी कळताच सोनवणे कुटुंबाने मोठा आक्रोश केला. घरातील दोन तरुण मुलं एकाच वेळी गमवावी लागल्याने सोनवणे कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Malegaon

    पुढील बातम्या