दरोडेखोरांच्या निशाणावर काँग्रेसच्या माजी आमदाराचं कुटुंब, बहिणीच्या घरी दरोडा

दरोडेखोरांच्या निशाणावर काँग्रेसच्या माजी आमदाराचं कुटुंब, बहिणीच्या घरी दरोडा

अज्ञात टोळीने घरात घुसून फातिमा हकीम आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली.

  • Share this:

मालेगाव, 5 मे : मालेगावातील काँग्रेसच्या माजी आमदार आयशा हकीम यांच्या बहीण फातिमा हकीम यांच्या बंगल्यावर दरोडा घालण्यात आला आहे. तसंच कुटुंबातील सदस्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मालेगाव शहरातील ताशकंद भागात ही घटना घडली आहे.

अज्ञात टोळीने घरात घुसून फातिमा हकीम आणि त्यांच्या मुलाला आणि इतर एकाला बेदम मारहाण केली. तसंच पिस्तूलचा धाक दाखवून लाखो रुपयांची लूट करत हे दरोडेखोर तिथून पसार झाले आहेत. या घटनेनं फातिमा हकीम आणि त्यांचं कुटुंब काहीसं घाबरेलेलं पाहायला मिळत आहे. दरम्यान, मारहाणीत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेनं ताशकंद परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत आता पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्यापपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस याबाबत आता अधिक तपास करत आहेत.

SPECIAL REPORT: बच्चे कंपनीची राजकीय जुगलबंदी, '...लाव रे तो व्हिडिओ'

First published: May 5, 2019, 7:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading