नाशिक, 20 जून : एका माथेफिरू गुंडाने आरपीएफ अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना नांदगाव रेल्वे स्थानकावरील घडली आहे. डी.के तिवारी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे त्यांना मालेगावच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हल्ला करणारा सुकेश तिरडे याला पोलिसांनी अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Malegaon Railway Station)
रेल्वे स्थानकात हा गुंड प्रवाशांना दमदाटी देत असतांना आरपीएफने त्याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी त्यांच्या कार्यालयात आणले असता त्याने अचानक आरपीएफ अधिकारी तिवारी यांच्यावर चाकूने हल्ला केला विशेष म्हणजे अधिकाऱ्यावर हल्ला केल्यानंतर त्याने स्वतःवर देखील वार करून घेतला असून तो गोंदिया येथील राहणारा आहे पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा : शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यासाठी आमदारांकडे 100 कोटींची मागणी, 4 जणांना अटक, 3 आमदार लागले होते गळाला!
दिड महिन्यापूर्वी झालेल्या घटनेची आठवण
नायजेरियन माथेफिरूने दहा जणांवर चाकूने विनाकारण हल्ला केल्याची घटना चर्चगेट परिसरातील फॅशन स्ट्रीट येथे घडली होती. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या आठ जणांवर रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले तर दोघे किरकोळ जखमी झाले होते. जॉन असे नाव सांगणारा हा नायजेरियन स्वतःही जखमी झाला होता आझाद मैदान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.
उच्च न्यायालयानजीक पारसी विहिरीजवळ जॉन हा त्याच्या मैत्रिणीसोबत होता. दोघांमध्ये सायंकाळी साडेचारच्या सुमारास भांडण झाले. यानंतर जॉन याने आपल्याकडील चाकू काढून आजूबाजूने चालणाऱ्या नागरिकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. लोकांचा पाठलाग करून तो हल्ला करीत होता. जॉन काही केल्या ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच आझाद मैदान पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. माथेफिरू जॉन याला कसेबसे ताब्यात घेतले.
हे ही वाचा : 'सेनेत खूप पुढे पुढे करतो का' म्हणत शिवसैनिकावर जीवघेणा हल्ला, शिंदे गटाच्या समर्थकावर आरोप
पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी जॉन याने दहा जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले होते. यापैकी आठ जणांवर रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले होते. जॉन याच्या हातालाही दुखापत झालेली त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जॉन दारू किंवा ड्रग्जच्या नशेत होता का? नेमका कशामुळे त्याने सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला चढविला याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत. दरम्यान या प्रकारामुळे गजबजलेल्या फॅशन स्ट्रीट परिसरात काही काळ घबराट पसरली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Malegaon, Malegaon news, Nashik