कोरोनाला हरवले पण मृत्यूने गाठले, मालेगावच्या योद्धाची चटका लावणारी एक्झिट

कोरोनाला हरवले पण मृत्यूने गाठले, मालेगावच्या योद्धाची चटका लावणारी एक्झिट

शेख मामू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जमादाराच्या मृत्यूमुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

  • Share this:

मालेगाव, 02 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले. कोरोनाच्या परिस्थितीत पोलीस दल आपल्या  जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावत आहे. मालेगावमध्ये एका पोलीस जमादाराला कोरोनाची लागण झाली होती. पण, कोरोनावर मात केल्यानंतर घरी आल्यावर ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मालेगावात घडली.

युनूस शेख असं या पोलीस जमादाराचे नाव असून ते मालेगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. शेख मामू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जमादाराच्या मृत्यूमुळे पोलीस दलात शोककळा पसरून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा -देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा खुलासा, उद्धव ठाकरेंना विचारला थेट सवाल

याबाबत अधिक वृत्त असे की, मालेगाव हा कोरोनाचा हॉट स्पॉट झाला असून येथे तब्बल  805 नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. त्यात कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिसांचा देखील समावेश आहे असून युनूस शेख हे मालेगावात कर्तव्य बजावत असतांना त्यांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी नाशिक येथे दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान त्यांनी कोरोनावर मात करून घरी परतले होते. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यावर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना नाशिकला हलविण्यात आले होते. मात्र येथे त्यांना ह्रदय विकाराचा तीव्र धक्का बसला आणि शेख मामू यांची प्राणज्योत मालवली.

हेही वाचा -पोलीस चक्रावले, 2 मुलींनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धरला लग्न करण्याचा हट्ट

या योध्याने कोरोनाला तर पराजित केले होते. मात्र, ह्रदय विकाराच्या धक्क्याने त्यांचा बळी घेतला. त्यांच्या मागे पत्नी,तीन मुले असा परिवार असून मालेगावच्या आयेशानगर कबरस्थानमध्ये त्यांचा दफनविधी पार पडला.

संपादन - सचिन साळवे

First published: June 2, 2020, 3:31 PM IST
Tags: malegaon

ताज्या बातम्या