BREAKING : मालेगाव सामान्य रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा, रात्री 1 वाजेपर्यंतच साठा शिल्लक

BREAKING : मालेगाव सामान्य रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा, रात्री 1 वाजेपर्यंतच साठा शिल्लक

सध्या सामान्य रुग्णालयामध्ये एकूण 103 रुग्ण असून त्यापैकी 14 व्हेंटिलेटरवर आहे तर 89 ऑक्सिजनवर आहेत.

  • Share this:

मालेगाव, 14 एप्रिल : राज्यात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे ऑक्सिजनचा (Oxygen shortage )तुटवडा जाणवू लागला आहे. मालेगावमधील (Malegaon) सामान्य रुग्णालयात (Malegaon General Hospital ) ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. आज रात्री 1 वाजेपर्यंत पुरले एवढाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे.

मालेगावमध्ये सध्या कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. मालेगावमधील कोरोनाबाधित रुग्ण सामान्य रुग्णलायात दाखल आहे. परंतु, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रात्री 1 वाजेपर्यंत पुरतील एवढाच ऑक्सिजन शिल्लक आहे.  लिक्विड ऑक्सिजन कमरतेमुळे अडचण येत आहे. मालेगावमधील खासगी रुग्णालयात देखील तुडवडा  निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला आहे.

सुशांत ड्रग्ज प्रकरणी NCB च्या हाती मोठी माहिती; दुबई कनेक्शनचा उलगडा

जर रात्रीतून पुरवठा न झाल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.  रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यासारखी परिस्थिती निर्माण  होऊ शकते, अशी माहिती सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ किशोर डांगे यांनी दिली.

आम्ही कोरोनावर नियंत्रण मिळवलेलं मात्र, BJPमुळे कोरोना वाढला : ममता बॅनर्जी

सध्या सामान्य रुग्णालयामध्ये एकूण 103 रुग्ण असून त्यापैकी 14 व्हेंटिलेटरवर आहे तर 89 ऑक्सिजनवर आहेत. या रुग्णांना रोज ऑक्सिजनचे 250 ते 300 जम्बो सिलेंडर लागतात. सध्या रुग्णालयात 90 जम्बो सिलेंडर शिल्लक असून ते पहाटे पर्यंत संपण्याची शक्यता आहे त्या नंतर काय करायचं असा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला पडला आहे.

Published by: sachin Salve
First published: April 14, 2021, 10:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या