Home /News /maharashtra /

प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काढला काटा, प्रियकराच्या मदतीने केली हत्या

प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काढला काटा, प्रियकराच्या मदतीने केली हत्या

पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करून खुनाचा गुन्हा केला दाखल केला आहे.

    बब्बू शेख, मालेगाव, 9 जानेवारी : प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मालेगावमध्ये घडली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा निर्घृणपणे आवळून त्याचा काटा काढला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. मालेगावच्या टाकळी इथं प्रेमसंबंधातून पतीची हत्या करण्यात आली. संदीप माना असे मयत पतीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला खुनाचा उलगडा करून संशयित पत्नी आणि तिचा प्रियकर विलास जगताप या दोघांना अटक करून खुनाचा गुन्हा केला दाखल केला आहे. जोडप्याचा वाद आणि तिसऱ्याचं मरण, पतीने मधे आलेल्या कार्यकर्त्यालाच केलं ठार गेल्या काही दिवसांपासून संदीप माना आणि त्यांच्या पत्नीमध्ये सतत खटके उडत होते. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल संदीप यांना काहीशी कल्पना आली होती. या मुद्द्यावरून ते सतत पत्नीला टोकत असत. त्यामुळे आपल्या प्रेमात अडथळा ठरत जाणाऱ्या पतीविषयी त्या महिलेचा राग वाढत गेला आणि तिने पतीच्या हत्येचा कट रचला. ज्या साडीचा पदर धरून चालणार त्याच साडीने घेतला जीव, 3 वर्षाच्या लेकीला आईनेच दिला गळफास आरोपी महिलेने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून पतीची क्रूरपणे हत्या केली. त्यानंतर आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पत्नीनेच आपल्या जीवनसाथीला संपवलं असल्याचं पोलीस तपासात उघड झालं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह प्रियकराला अटक केली असून पोलिसांकडून आता पुढील तपास करण्यात येत आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या