Home /News /maharashtra /

कोरोनाच्या संकटात मालेगाव हादरलं, दोन महिलांचा ICU मध्ये मृत्यू

कोरोनाच्या संकटात मालेगाव हादरलं, दोन महिलांचा ICU मध्ये मृत्यू

मालेगाव सामान्य रुग्णालयात आज पहाटेच्या सुमारास दोन महिलांचा अतिदक्षता विभागात मृत्यू झाल्याची घटना घडली

मालेगाव, 14 एप्रिल : कोरोना व्हायरसने महाराष्ट्राला विळखा घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मुंबईत सर्वाधिक आढळून आले आहे. तर त्यापाठोपाठ मालेगावही कोरोनाचं व्हॉटस्पॉटच्या उंबरठ्यावर येऊन ठेवले आहे. अशातच दोन महिलांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. मालेगाव सामान्य रुग्णालयात आज पहाटेच्या सुमारास दोन महिलांचा अतिदक्षता विभागात मृत्यू झाल्याची घटना घडली. या महिलांना न्युमोनिया, श्वसनाचा, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी  दिली. यामध्ये एक 58 वर्षीय महिला मालेगाव शहरातील असून दुसरी महिला नांदगाव तालुक्यातील असल्याचे समजते. या महिलेचे वय साधारणत: 48 वर्षे सांगण्यात आले आहे. हेही वाचा -कोरोनाचा कहर! अमेरिकेत 22000 जणांचा मृत्यू, बाधितांची संख्या 5 लाखांहून अधिक मालेगाव शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर दोन्ही महिलांचे घशातील स्वब नमुने पुण्याला पाठविण्यात आले आहे.  हा अहवाल आल्यानंतरच या महिलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समोर येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव शहरातील आणि नांदगाव तालुक्यातील दोन्ही महिला येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी शनिवारी दाखल झाल्या होत्या. यातील एका महिलेला श्वसनाचा अधिक त्रास होत होता तर दुसरी मधुमेह आणि रक्तदाबाच्या त्रासाने ग्रासली होती. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्याचे येथील डॉक्टरांनी ठरवले होते. हेही वाचा -मोदींआधीच 'या' राज्यांनी वाढवला लॉकडाऊन, पंतप्रधानांच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष रविवारी रात्री या महिलांचा त्रास अधिकच वाढला होता. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास या महिलांनी उपचारास प्रतिसाद देणे बंद केले. सध्या कोरोना विषाणूचे सावट मालेगाववर असल्यामुळे दोन्हीही महिलांचे स्वब नमुने पुण्यात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. उद्या रात्रीपर्यंत हे अहवाल येण्याची शक्यता आहे. हे अहवाल आल्यावरच या महिलांचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे. मृत्यूनंतर महिलांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Malegaon

पुढील बातम्या