मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपनिश्चिती लांबणीवरच

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपनिश्चिती लांबणीवरच

मी बाबरी पाडायलाही गेले होते आणि आता राम मंदिर बांधायला ही जाईन असं धक्कादायक वक्तव्यही साध्वी प्रज्ञा यांनी केलं होतं

  • Share this:

मुंबई, ०५, सप्टेंबर- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज विशेष एनआयए कोर्टाकडून आरोपनिश्चिती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता ही आरोपनिश्चिती लांबणीवर पडली आहे. आधी आरोपींवर लावण्यात आलेल्या UAPA च्या कलमांची वैध्यता पडताळली जाणार असे उच्च न्यायालयातर्फे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाला माहिती दिली. कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा आणि अन्य आरोपींवर आज आरोप निश्चित केले जातील अशीच चर्चा होती.

मंगळवारी हायकोर्टानं आरोपींना दिलासा देण्यास नकार दिला होता. गैरकृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलमं लावायची की नाही, हा निर्णय एनआयए कोर्टानं घ्यावा, असा निर्णय हायकोर्टानं दिला. तर कोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला. २००८ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह अन्य आरोपींवर करण्यात येणाऱ्या आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता.

पुरोहितने खटला चालवण्यास देण्यात आलेल्या मंजुरीचा जो मुद्दा उपस्थित केला, त्याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिलेल्या निर्देशांनुसार घेण्यात यावा आणि त्यानुसार खटल्याचे पुढचे कामकाज करावे, असे आदेशही उच्च न्यायालयातर्फे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाला या वेळी देण्यात आले. पण आता आरोपींवरची आरोपनिश्चिती व्हायला किमान काही दिवस अजून लागतील असेच म्हणावे लागेल.

मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणात मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने २७ डिसेंबर २०१७ ला आरोपनिश्चीती केली होती. यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह पाच आरोपींविरोधातील मोक्का हटवण्यात आला होता. त्यामुळे या आरोपींना काहीसा दिलासा मिळाला होता.

२००८ मधल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी रमेश उपाध्याय आणि अजय रहीकर यांच्यावरचाही मोक्का हटवण्यात आला होता. यूएपीए कलम १७, २०, आणि १३ हटवण्यात आले होते. तसंच कोर्टाने शिवनारायण कालसंग्रा आणि श्याम साहूसह सर्व आरोपींची सुटकादेखील केली होती.

याआधी एप्रिल महिन्यात साध्वी प्रज्ञा आणि आॅगस्टमध्ये कर्नल पुरोहित यांना जामीन मिळाला होता. पुरोहित नऊ वर्ष तुरुंगात राहिले होते. साध्वी प्रज्ञा या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रमुख आरोपी होत्या. त्याप्रकरणी काही वर्ष त्यांना शिक्षाही झाली. नंतर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

VIDEO : याला कुणी आवरा रे...

First published: September 5, 2018, 12:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading