मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाराष्ट्रात अफवेचं भूत, मालेगावात चौघांना स्थानिकांकडून बेदम मारहाण

महाराष्ट्रात अफवेचं भूत, मालेगावात चौघांना स्थानिकांकडून बेदम मारहाण

मुले पळवणाऱ्या टोळीच्या अफवेचं लोण मालेगावमध्ये देखील पोहोचलं आहे. मालेगाव शहरातील अली अकबर हॉस्पिटलच्या मागे असलेल्या आझादनगर भागात मुलं पळवणारी टोळी समजून चार जणांना जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे.

    मालेगाव, 02 जुलै : मुले पळवणाऱ्या टोळीच्या अफवेचं लोण मालेगावमध्ये देखील पोहोचलं आहे. मालेगाव शहरातील अली अकबर हॉस्पिटलच्या मागे असलेल्या आझादनगर भागात मुलं पळवणारी टोळी समजून चार जणांना जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे.

    घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चौघांना जमावाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त जमावाने पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली. अखेर पोलिसांनी जमावाची समजूत काढून त्यांना शांत करून परिस्थितीवर नियंत्रण आणलं. त्यानंतर पोलिसांच्या तावडीत असलेल्या चौघांना ताब्यातही घेतलं.

    हेही वाचा

    धुळ्यात 5 जणांच्या हत्येनं हादरला महाराष्ट्र, आतापर्यंत 23 संशयितांना अटक

    बुरांडी मृत्यू प्रकरण : रजिस्टरमध्ये लिहिला होता मृत्यूचा प्लान, ठरल्या होत्या फाशी घेण्याच्या जागा

    बेताल विधान करणाऱ्या संभाजी भिडेंच्या सभांवर बंदी आणा, रामदास आठवलेंची मागणी

    चौघेही जण परभणी जिल्ह्यातील असल्याचं समजतंय. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

    किडनीसाठी मुलं चोरणारी टोळी गावात आल्याच्या संशयावरून धुळे जिल्ह्यात काल 5 जणांची ठेचून हत्या करण्यात आली, याप्रकरणी पोलिसांनी राईनपाडा गावातल्या 23 जणांना अटक केलीये. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

    रविवारी संध्याकाळी पोलिसांचं फोरेन्सिक पथकही गावात येऊन गेलं. गावातले बहुतांश पुरुष गाव सोडून गेलेत, त्यामुळे गावात फक्त महिला, वृद्ध आणि लहान मुलं उरली आहेत.

    दरम्यान, आमच्याकडे राज्यातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनचा शिक्का आहे, आम्हाला मारू नका, आम्ही मुलं चोरत नाही, अशी याचना ते 5 जण करत होते, पण त्यांचा जीवच घ्यायचा, असा निर्णय जमावानं घेतला होता, असं प्रत्यक्षदर्शी सखाराम पवार यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना सांगितलं.

    First published:

    Tags: अफवा, टोळी, मारहाण, मालेगाव