• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • टक्कर देऊन 4 किमी दूर जाऊन सोडला जीव, माळशिरसमध्ये रेड्याचा दुर्दैवी मृत्यू

टक्कर देऊन 4 किमी दूर जाऊन सोडला जीव, माळशिरसमध्ये रेड्याचा दुर्दैवी मृत्यू

विशेष म्हणजे, या टकरी भरविण्यासाठी गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित असल्याची चर्चा गावात सुरू आहे.

विशेष म्हणजे, या टकरी भरविण्यासाठी गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित असल्याची चर्चा गावात सुरू आहे.

विशेष म्हणजे, या टकरी भरविण्यासाठी गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित असल्याची चर्चा गावात सुरू आहे.

  • Share this:
वेळापूर, 07 नोव्हेंबर : राज्यात एकीकडे बैलगाडी शर्यतीवर (bullock cart race) बंदी करण्यात आली असतानाही बैलगाडा शर्यतीचा घाट घातला जातो. तर दुसरीकडे माळशिरसमध्ये (malshirash) रेड्याची झुंज आयोजित करण्यात आली. दुर्दैवाची बाब म्हणजे, रेड्याच्या टकरीनंतर एका रेड्याचा करूण अंत झाला. खळवे, ता. माळशिरस येथे दिवाळीनिमित्त म्हसोबा मंदिर येथील पटांगणात रेड्याच्या टकरी भरविण्यात आल्या होत्या. आज रविवार सकाळी 09 वाजल्याच्या दरम्यान टकरी सुरू झाल्या.  यामध्ये भंडीशेगाव येथील एक रेडा व पटवर्धन कुरोली येथील एक रेडा अश्या टकरी लावण्यात आल्या होत्या. टकरी सुरू झाल्यानंतर यातील पटवर्धन कुरोली येथील रेडा रस्त्याने तीन ते चार किलोमीटर पळत जाऊन मरण पावला. माळशिरस येथील वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील खळवे येथे दिवाळीनिमित्त रेड्याच्या टकरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासनाचे नियम डावलून या टकरीचे आयोजन झाले होते.  या टकरीमध्ये एका रेड्याचा मृत्यू झाला असून सदर टकरीचे आयोजन करण्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. आलिया- रणबीर पोहचले नवीन घराचं बांधकाम पाहण्यास; कपड्यांवरून झाले ट्रोल दरम्यान, प्रशासनाच्या नियमांना पायदळी तुडवून अश्या टकरी आयोजित करून पशुहत्या साठी जबाबदार ठरलेल्या आयोजकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, या टकरी भरविण्यासाठी गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित असल्याची चर्चा गावात सुरू आहे. गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात बैलगाडा शर्यत, 200 जणांवर गुन्हे दाखल दरम्यान,  बैलगाडा शर्यत आयोजनावर बंदी असतानाही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Maharashtra Home Minister Dilip Walase Patil) यांच्या मतदारसंघात शर्यत भरवण्यात आली. याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे. एकूण 200 जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात आंबेगाव (Aambegaon) तालुक्यातील गिरवली आणि वडगाव काशिंबे गावात दिवाळी पाडव्याच्या दिवशी बैलगाडा शर्यतीचं (Bullock cart race on Diwali Padwa) आयोजन करण्यात आलं होतं. विराट बघतच राहिला, पण...लागोपाठ तीन 'वर्ल्ड कप'मध्ये एकाच गोष्टीने घात केला घोडेगाव पोलिसांत पाच जणांसह 100 अज्ञातांवर, तर मंचर पोलिसांत पाच जणांसह 100 अज्ञातांवर भा. दं. वि. क. 188, प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (अ), म.पो.का.क. 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by:sachin Salve
First published: