इंडियाज् बेस्ट डान्सर्सच्या सेटवर मलायकाचा जलवा; ग्लॅमरस लूक पाहून तुम्हीही म्हणाल, Wow

मलायका अरोरा (Malaika Arora)ने इंडियाज बेस्ट डान्सरच्या सेटवर तुफान अदाकारी करत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.

मलायका अरोरा (Malaika Arora)ने इंडियाज बेस्ट डान्सरच्या सेटवर तुफान अदाकारी करत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.

 • Share this:
  मुंबई, 02 ऑक्टोबर: नवनवे फॅशन ट्रेंड सेट करण्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचा कोणीही हात धरु शकणार नाही. रिअ‍ॅलिटी शोमध्ये ग्लॅमरस अवतारात अवतरणाऱ्या मलायकाचे लूक सोशल मीडियावर येतात आणि चाहत्यांना घायाळ करतात. उंच, शिडशिडीत देहयष्टीची मलाइका अलीकडेच एका डान्स शोमध्ये झगमगीत शिफॉन साडीत दिसली. इन्स्टाग्रामवर तिचे फोटो पोस्ट होताच नेटिझन्सच्या त्यावर उड्या पडल्या. ख्यातनाम फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या या साडीवर मलाइकाने परिधान केलेलं पेस्टल ब्लाऊज,  स्टड्स इअररिंग्ज आणि बोटांतील टपोरी अंगठी नजरेत भरत होती. मलाइकाच्या दिलखेचक अदाकारीला निमित्त होतं इंडियाज बेस्ट डान्सरच्या अखेरच्या एपिसोडचं. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेने आपल्या 3000 ‘हॅप्पीसोड्स’चा टप्पा पार केल्याचा जल्लोषही या वेळी करण्यात आला. मालिकेतील झाडून सगळे कलाकारही या वेळी स्टेजवर अवतरले आणि मलायकाच्या ठुमक्यावर थिरकले.
  मलायकाने याच पेहरावासह आणखी एक पोस्ट शेअर केली. त्याची कॅप्शन फारच बोलकी आहे. स्टॅण्ड टॉल अँड प्राउड...@मनीषमल्होत्रा 05 X@रूपावोहरा फाईन ज्वेलरी अशी ही कॅप्शन होती. या पोस्टवर मनीष मल्होत्राने हार्टची इमोजी टाकून आपल्या इमोशन्स व्यक्त केल्या आहेत. “देसी गर्ल... ठूमका तो बनता हैं.. आज रात 8 बजे ओन्ली ऑन सोनीटीव्ही” अशा कॅप्शनखाली मलाइकाने एक व्हिडिओही शेअर केला.
  View this post on Instagram

  Desi gurlllll..... thumka tho Banta hai.... aaj raat 8pm only on @sonytvofficial #indiasbestdancer

  A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

  ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या अखेरच्या शोमध्ये डान्स, मस्ती, कॉमेडीची रेलचेल होती. ‘तारक मेहता’च्या कलाकारांनी मंचावर धमाल केली. जेठालाल, बापूजी, पोपटलाल अशा सगळ्याच पात्रांनी मलायकाच्या अनारकली डिस्को चली..च्या ठुमक्यावर थिरकून शोमध्ये रंगत आणली. मास्क वापरण्याबाबत मलायका जागृत कोरोनाच्या साथीकडे दुर्लक्ष करू नका, असं आवाहन करत मलाइकाने मास्कबाबत जाणीव जागृतीत पुढाकार घेतला आहे. कोरोनाशी लढा देण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा, असं आवाहन तिने लोकांना केलं आहे. मास्कच्या वापराने स्वत:चा धोका टळतोच, पण इतरांनाही सुरक्षितता मिळते, अशा शब्दांत मलायकाने मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published: