कापडी पिशव्यांसाठी महापालिकेला ५ कोटी रुपये देणार - रामदास कदम

कापडी पिशव्यांसाठी महापालिकेला ५ कोटी रुपये देणार - रामदास कदम

प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीत नागरिकांना अडचणीला तोंड द्यावे लागू नये यासाठी मोठ्या प्रमाणात कापडी पिशव्या बाजारात आणण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

  • Share this:

21 मार्च : प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीत नागरिकांना अडचणीला तोंड द्यावे लागू नये यासाठी मोठ्या प्रमाणात कापडी पिशव्या बाजारात आणण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. बृहन्मुंबई महापालिकेला त्यासाठी ५ कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत सांगितले.

प्लॅस्टिक बंदीचा घेतलेला निर्णय अचानक घेण्यात आलेला नाही. २ जानेवारी रोजी याबाबत अधिसूचना करण्यात आली होती. गुढीपाडव्यापासून पूर्णत: प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात येईल असे तेव्हाच जाहीर करण्यात आलं होतं असंही त्यांनी सांगितलं.

मुंबईच्या समुद्रात प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा साचलेला आहे. आणि प्लास्टिकमुळे पर्यावरणाला होणारा त्रास यावर राज्यातील सर्व विभागांत बैठका घेण्यात आल्या होत्या. तसंच संपूर्ण प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2018 08:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading