Pulwama Attack :'मुस्लिम बटालियन तयार करा आणि सीमेवर पाठवा'

Pulwama Attack :'मुस्लिम बटालियन तयार करा आणि सीमेवर पाठवा'

जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटत आहेत.

  • Share this:

नाशिक, 16 फेब्रुवारी: जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटत आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील नागरिकांनी अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळला आहे. काही ठिकाणी मोर्चे काढण्यात आले आहेत. अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी नागरिक करत आहेत. अशातच केंद्र सरकारने मुस्लिम बटालियन तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वाचा- Pulwama: दहशतवाद्यांना कुठे, कधी आणि कशी शिक्षा द्यायची हे भारतीय जवानच ठरवतील- PM मोदी

पुलवामामधील अंवतीपोरा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशातील अन्य भागाप्रमाणेच नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील बंद, मोर्चे, पुतळा दहन आंदोलन करण्यात आले. मनमाडला आरपीआय, व्यापारी महासंघाने रॅलीकाढून पाकिस्तान व हल्ल्याचा तीव्र निषेध केला. मालेगावमध्ये माजी आमदार आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या.

हे देखील वाचा- Pulwama हल्ल्याच्या निषेधार्थ थांबवली मुंबईची लाईफ लाईन, नालासोपाऱ्यात प्रवाशांचा उद्रेक

दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकारने इतर बटालियन प्रमाणे सैन्यात मुस्लिम बटालियन तयार करुन त्यांना सीमेवर तैनात करावे, अशी मागणी इस्माईल यांनी केली. या बटालियनसाठी मालेगावमधून शेकडो नव्हे तर हजारो मुस्लिम तयार असल्याचे इस्माईल यांनी सांगितले.

दरम्यान येवला व चांदवड तालुक्यातील अनेक गावात दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी संतप्त नागरिकांनी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

'शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही', मोदींचं UNCUT भाषण

First published: February 16, 2019, 2:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading