• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: 'मेक इन इंडिया'ला झटका; स्वदेशी विमानाचं स्वप्न भंगलं
  • SPECIAL REPORT: 'मेक इन इंडिया'ला झटका; स्वदेशी विमानाचं स्वप्न भंगलं

    News18 Lokmat | Published On: Apr 10, 2019 09:09 AM IST | Updated On: Apr 10, 2019 10:01 AM IST

    मुंबई, 10 एप्रिल : पालघर परिसरात घराच्या छतावर स्वदेशी तंत्रज्ञान वापरुन छोटेखानी विमान तयार करणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांनी आता अमेरिकेत प्रकल्प हलवण्याचा निर्णय़ घेतला आहे. सरकारी लालफितीच्या कारभाराला कंटाळून यादव यांनी हा निर्णय घेतलाय. खरं तर 2018मध्ये 'मेक इन इंडिया' प्रकल्पांतर्गत एमआयडीसीनं अमोल यादवा यांच्या कंपनीशी 35 हजार कोटींचा सामंजस्य करार केला होता. विशेष म्हणजे, 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला होता. त्यानुसार सहा असनी विमान निर्मितीसाठी राज्य सरकारकडून पालघर परिसरात 157 एकर जमीन उपलब्ध करुन दिली जाणार होती. तसंच विमान निर्मिती आणि उड्डाण परवाना दिला जाणार होता. मात्र, गेल्या वर्षभरात कॅप्टन अमोल यादव यांना ना जागा मिळाली, ना परवाना. उलट अमेरिकेनं त्यांना सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading