संक्रांतीला पतंग उडवताना तुटला आयुष्याचा दोर, 11 वर्षीय मुलाचा धक्कादायक मृत्यू

संक्रांतीला पतंग उडवताना तुटला आयुष्याचा दोर, 11 वर्षीय मुलाचा धक्कादायक मृत्यू

सिन्नरच्या उगले लॉन्सजवळील शेती परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेत आर्यन विलास नवाळे या 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 15 जानेवारी : संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांतीचा उत्सव आनंदाने साजरा होत असताना नाशिकच्या सिन्नरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सिन्नरच्या उगले लॉन्सजवळील शेती परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेत आर्यन विलास नवाळे या 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. सकाळी 9:15 च्या सुमारास पतंग पकडण्याच्या नादात हा मुलगा कठड्यावरून विहिरीत कोसळला. यामध्ये पाण्यात बुडाल्याने मुलाचा मृत्यू झाला आहे.

साधारण 35 फूट पाणी असलेल्या विहिरीत पडल्याने आणि कुठलीच मदत मिळू न शकल्याने त्याचा अंत झाला. दीड तास प्रयत्न केल्यानंतर सिन्नरच्या अग्निशामक दलास त्याचा मृतदेह काढण्यात यश मिळालं. आई-वडिलांनी घटनास्थळी टाहो फोडत पतंगाप्रती आपला रोषही व्यक्त केला आहे. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवताना आयुष्याची दोर तुटल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

इतर बातम्या - अभिनेत्रीची विमानात छेड काढणं पडलं महागात, कोर्टाने सुनावली 3 वर्षांची शिक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील 4 ते 5 मुलं पटमग पकडत असताना आर्यन विहिरीत कोसळला. भेदरलेल्या मुलांनी धावत जाऊन त्याचं घर गाठत आईला प्रसंगाची माहिती दिली, मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता. विहिरीत पाण्याची पातळी वाढली होती. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुणाला पोहता आलं नाही आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणाची माहिती पोलिसांची देण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. आर्यनचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

इतर बातम्या - संजय राऊतांचा उदयनराजेंवर हल्लाबोल; म्हणाले, वंशज असल्याचे पुरावे घेऊन या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2020 03:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading