पंकजा मुंडेंना धक्का, ...आणखी एक भाऊ राष्ट्रवादीत!

पंकजा मुंडेंना धक्का, ...आणखी एक भाऊ राष्ट्रवादीत!

राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे चुलत बंधु रामेश्‍वर मुंडे यांनी आज भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

  • Share this:

परळी, 16 एप्रिल: राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे चुलत बंधु रामेश्‍वर मुंडे यांनी आज भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंकजा मुंडेंवर नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये कार्यकर्त्यांचे कुठेलच काम होत नाही, सातत्याने अन्याय होत असल्याने आपण हा निर्णय घेतला असल्याचे रामेश्‍वर मुंडे यांनी या प्रवेशाबाबत सांगितले.

गोपीनाथ मुंडे यांचे बंधु व्यंक्टराव मुंडे यांचे चिरंजीव असलेले भाजपचे युवा नेते रामेश्‍वर मुंडे हे आतापर्यंत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभे होते. मात्र नाराजी व्यक्त करत ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मोठा धक्का समजाला जात आहे. परळी शहरातील भाजपची यंत्रणा रामेश्वर मुंडे पाहत होते. यामुळे जवळच्या नात्यातील रामेश्‍वर मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर प्रवेश केल्याने पंकजा मुंडे व खा.डॉ.प्रितम मुंडे यांच्या सोबत आता मुंडे घराण्यातील एकही भाऊ राजकरणात सोबत राहिलेला नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.

बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराची शेवटची सभा परळी शहरातील मोंढा मैदानावर संपन्न झाली. या सभेला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे, जि.प.सदस्य अजय मुंडे, यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

VIDEO : सुशीलकुमार शिंदे झाले भावुक, निवडणुकांबद्दल घेतला मोठा निर्णय

First published: April 16, 2019, 8:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading