Home /News /maharashtra /

चक्रीवादळ धडकण्याआधी अलिबागमध्ये प्रशासनाची मोठी मोहीम फत्ते

चक्रीवादळ धडकण्याआधी अलिबागमध्ये प्रशासनाची मोठी मोहीम फत्ते

अरबी समुद्रकिनारपट्टीवर घोंगावणाऱ्या निसर्ग चक्रीवादळाचा धोका रायगड जिल्ह्याला मोठा असल्याने वेळीच पावलं उचलण्यात आली.

रायगड, 03 जून : अरबी समुद्रात तयार झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या दिशेला कूच केली आहे. हे चक्रीवादळ काही तासात महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. खबरदारी म्हणून रायगड जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. अरबी समुद्रकिनारपट्टीवर घोंगावणाऱ्या निसर्ग चक्रीवादळाचा धोका रायगड जिल्ह्याला मोठा असल्याने कालपासूनच  जिल्ह्यातील 11 हजार 260 हजार नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने शाळा, मंगल कार्यालय, समाज मंदिरांमध्ये हलवण्यात आले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) चार पथके जिल्ह्यात दाखल झाली आहेत. हेही वाचा -Live Updates : 'निसर्ग' 50 किलोमीटर दक्षिणेला सरकलं, अलिबाग ऐवजी मुरुडला धडकणार जिल्ह्यात दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली असून निसर्ग चक्रीवादळ हे अलिबाग समुद्रकिनारी येणार असल्याचे समजताच प्रशासनाकडून वेगवान हालचाली करण्यात आल्या. एकट्या अलिबाग तालुक्यात एनडीआरएफच्या तीन तुकड्या आल्या असून त्यांनी समुद्र किनारी गावातील परिस्थितीची पाहणी केली आहे. अलिबाग तालुक्यातील 4 हजार 407, पेण 87, मुरुड 2 हजार 407, उरण 1 हजार 512, पनवेल 55, श्रीवर्धन, 2553, म्हसळा 239 अशा 11 हजार 260 नागरिकांना जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाच्या वतीने  सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या नागरिकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. हेही वाचा -भलामोठा जहाज इला, चक्रीवादळाचा तडाखा काय असतो हे सांगणार हा VIDEO संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या