ठाण्यात एका बहुमजली इमारतीच्या टेरेसवर मोठी आग, अग्नीशमन दल घटनास्थळी

ठाण्यात एका बहुमजली इमारतीच्या टेरेसवर मोठी आग, अग्नीशमन दल घटनास्थळी

ठाण्यात एका बहुमजली इमारतीच्या टेरेसवर भीषण आग लागली आहे. ठाणे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.

  • Share this:

ठाणे,28 फेब्रुवारी: ठाण्यात एका बहुमजली इमारतीच्या टेरेसवर शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली आहे. ठाणे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.

ठाणे (पश्चिम) येथील नौपाडामधील भगवती शाळेजवळील सोहम ट्रीपिकल युनिट या 22 मजली इमारतीच्या टेरेसवर आग लागली आहे. आग कशामुळे लागली, कशाला लागली, याबाबत माहिती अद्याप समजू शकलेली नाही. ठाणे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.

आग लागलेली इमारत निर्माणाधीन आहे. आगीमुळे टेरेसवरील साहित्य खाली पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे इमारतीच्या आजू बाजूचा परीसर मोकळा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

इमारतीचे बांधकाम सुरु असल्याने टेरेसवर उघड्यावर असलेल्या वायर, केमिकल, कास्टिंग प्लेट, सळया, प्लास्टिक जळत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

धुळ्यात दोन दुकाने जळून खाक

दुसरीकडे, धुळे शहरातील गल्ली नंबर 4 मध्ये असलेल्या कांती कॉम्पलेक्समध्ये अचानक दोन दुकानांना आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली़ आगीची घटना लक्षात येताच महापालिकेच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली. या आगीत गादीचे आणि मोबाईलचे दुकान जळून खाक झाले आहे. कांती कॉम्पलेक्सच्या मागीव बाजुस कचरा होता. या कचऱ्याला आग लागल्यामुळे ही आग पसरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहेय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2020 03:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading