Home /News /maharashtra /

Dombivli Fire: डोंबिवली स्टेशन जवळील इमारतीला भीषण आग

Dombivli Fire: डोंबिवली स्टेशन जवळील इमारतीला भीषण आग

Dombivali building fire: डोंबिवली पूर्व परिसरात इमारतीला भीषण आग लागली आहे.

डोंबिवली, 15 जुलै: डोंबिवली पूर्व (Dombivli East) परिसरात एका इमारतीला भीषण आग (Major fire) लागली आहे. डोंबिवली स्टेशनजवळील लक्ष्मी निवास इमारतीला (Laxmi Nivas Building) ही आग लागली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग इतकी भीषण आहे की धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले आहेत. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळालेली नाहीये. या इमारतीत गोडाऊन असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच आग लागल्याने इमारतीत काही नागरिक अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे. "आमदारांवर विश्वास नाही त्यामुळे निवडणूक पद्धत बदलीचा विषय आला" आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोडाऊनमध्ये ही सर्वप्रथम आग लागली आणि त्यानंतर इमारतीत इतरत्र पसरली. इमारतीच्या संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. त्यावरुन ही आग किती भीषण आहे याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. ही इमारत स्टेशनच्या जवळ असून इमारतीच्या समोरच स्कायवॉक सुद्धा आहे. घटनास्थळावर नागरिकांनीही मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळत आहे. स्टेशनजवळचा परिसर गजबजलेला आणि दाटीवाटीचा असल्याने अग्निशमन दलालाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Dombivali, Fire, Railways

पुढील बातम्या