मुंबई, 5 ऑगस्ट : मुंबईतून एक खूप मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील नामांकित वाडिया रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आगीची भीषण घटना घडली आहे. वाडिया रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर आहे. हे ऑपरेशन थिएटर आज बंद होतं. त्याच ऑपरेशन थिएटरमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानाकडून आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. आग नेमकी का लागली ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण आगीच्या घटनेने परिसर प्रचंड हादरला आहे.
अग्निशमन दलाकडून आगीबाबत माहिती देण्यात आली आहे. ही आग लेव्हल दोनची आग आहे. ही आग संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास लागली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली. अग्निशमन दल युद्धपातळीवर घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन विभागाच्या अनेक गाड्या घटनास्थळाच्या दिशेला रवाना करण्यात आल्या. दरम्यान या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच कुणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
VIDEO : मुंबईच्या वाडिया रुग्णालयात आग लागली आहे #Mumbi#Firepic.twitter.com/eyYLPgCoZw
(उमेश कोल्हेच्या हत्येनंतर डिनर पार्टीचं आयोजन; आणखी दोघांना अटक, NIA ला मोठं यश)
मुंबईतील वाडिया रुग्णालय हे लहान मुलांचं रुग्णालय म्हणून ओळखलं जातं. या रुग्णालयात आगीची घटना ही अनपेक्षित आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल आहेत. आग लागल्यानंतर पहिल्या मजल्यातून धूर बाहेर येताना दिसत होता. त्यानंतर पहिल्या मजल्यावर ज्या लहान बाळांवर उपचार सुरु होते त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. संबंधित आग ही शॉर्ट सक्रिटमुळे लागली असा अंदाज आहे.
दरम्यान, आगीच्या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशी फोनवर बातचित केली. त्यांनी वाडिया रुग्णालयातील आगीच्या दूर्घटनेची माहीती घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल लहान मुलांच्या सुरक्षेची चौकशी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.