भीषण अपघात! कार-दुचाकीची समोरासमोर धडक, वनरक्षकाचा जागेवरच मृत्यू

भीषण अपघात! कार-दुचाकीची समोरासमोर धडक, वनरक्षकाचा जागेवरच मृत्यू

कार आणि दुचाकीच्या भीषण अपघाता वनरक्षकाचा जागेवरच मृत्यू झाला.

  • Share this:

भुसावळ, 14 जून: कार आणि दुचाकीच्या भीषण अपघाता वनरक्षकाचा जागेवरच मृत्यू झाला. डी. डी. जाधव (वय-45, रा. भुसावळ) असं मृत वनरक्षकाचं नाव असून ते रावेर वनविभागात कार्यरत होते. बामणोदजवळ शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला. फैजपूर पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा... प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं राहत्या घरी केली आत्महत्या

मिळालेली माहिती अशी की, पाल (ता. रावेर) येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असलेले डी.डी. जाधव हे शनिवारी रात्री पाल येथून दुचाकीने भुसावळ येथे घरी येत होते. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास भुसावळकडून फैजपूरकडे जाणाऱ्या कारने जाधव यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला.

डी.डी. जाधव हे आधी यावल वनविभागात कार्यरत होते. ते मूळचे जामनेर येथील रहिवासी आहेत. ते भुसावळ येथे त्यांच्या पत्नी व मुलगा, मुलगी यांच्यासह राहत होते. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन मधील कर्मचारी दीपक जाधव यांचे ते भाऊ तर जामनेर येथील अशोक जाधव (पैहलवान) यांचे ते पुतणे होते.

हेही वाचा...शरद पवार यांच्या निकटवर्तीय नेत्याचं सोलापुरात कोरोनामुळे निधन

जाधव यांच्या अपघाती निधनामुळे नातेवाईकांमध्ये तसेच वन कर्मचारीवर्गात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी सकाळी 10 वाजता यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विनेश पावरा यांनी शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकाकडे सुपूर्द केले.

First published: June 14, 2020, 3:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या