Home /News /maharashtra /

नगरमध्ये 24 तबलिगींना अटक, धक्कादायक माहिती आली समोर

नगरमध्ये 24 तबलिगींना अटक, धक्कादायक माहिती आली समोर

या जमातीचं आचरण करणाऱ्यांमध्ये जगातले बरेच नामवंत चेहरे आहेत. ज्यात भारताचे माजी राष्ट्रपती झाकीर हुसैन, मौलाना तारिक जमील, पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी आणि सईद अन्वर यांचा समावेश आहे.

या जमातीचं आचरण करणाऱ्यांमध्ये जगातले बरेच नामवंत चेहरे आहेत. ज्यात भारताचे माजी राष्ट्रपती झाकीर हुसैन, मौलाना तारिक जमील, पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी आणि सईद अन्वर यांचा समावेश आहे.

तबलिगी जमातीच्या मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक हे कायद्याचे उल्लंघन करून नगरमध्ये राहिल्याने त्यांना शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली आहे.

अहमदनगर, 18 एप्रिल : दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकजला हजेरी लावल्यानंतर नगरमध्ये आलेल्या परदेशी नागरिकांवर पोलिसांनी कारवाईचे मोठे पाऊल उचलले आहे. आज अशा 24 परदेशी नागरिकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तबलिगी जमातीच्या मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक हे कायद्याचे उल्लंघन करून नगरमध्ये राहिल्याने त्यांना शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधून सोडल्यानंतर 24 परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज नगरमधील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. हेही वाचा- मुंबईकरांना मोठा दिलासा! या 'रेड झोन' परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट तबलिगी जमातच्या मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक व्हिसाचा गैरवापर करत असल्याचं उघडकीस आले आहे. पर्यटन व्हिसावर आलेले असताना ते व्हिसामधील अटीचे उल्लंघन करून धर्मप्रसार करत असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे नगरला आलेले 29 परदेशी नागरिक आणि त्यांना मदत करणाऱ्या अन्य पाच नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. नगरमधील भिंगार, जामखेड, नेवासा पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. हेही वाचा - पतीशी भांडण करुन घराबाहेर पडलेली महिला सापडली 'कोरोना'च्या तावडीत! यापैकी सिव्हिलमध्ये उपचार घेत असलेले पाच परदेशी नागरिक सोडून अन्य 29 जणांना आज अटक करण्यात आली आहे. त्यात पाच भारतीयांचा समावेश आहे. ते भाषांतरकार म्हणून त्यांच्यासोबत होते. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या