बुलडाणा, अमोल गावंडे,10 एप्रिल- मलकापूर-नांदुरा तालुक्यातील धानोरा फाट्याजवळ भीषण अपघात झाला. धडक एवढी जोरदार होती की, दोन्ही वाहने जळून खाक झालीत. या अपघात दोन जण ठार झाले आहेत. शुभम हिवाळे (वय-22), ज्ञानेश्वर इंगळे (वय-25) अशी मृतांची नावे आहेत. बुधवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली. या घटनेने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
मलकापूरहून नांदुराकडे दोन वाहने येत होती. दरम्यान, समोर जाणार्या वाहनाला मागील बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात एका वाहनाने अचानक पेट घेतला. अपघाताची भीषणता एवढी होती की, मागील वाहन सुद्धा जळून खाक झाले. या अपघाताने खामगाव ते मलकापूर मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी केली होती.
VIDEO: रामदास आठवलेंनी वर्तवलं पवारांच्या बालेकिल्ल्याचं भाकीत