गडचिरोली,5 मार्च: मालवाहू टाटा एस आणि टिप्पर यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघाता दोन जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. आलापल्लीपासून सात किलोमीटर अंतरावरील तानबोडी फाट्या जवळ गुरुवारी दुपारी 2 वाजता हा आपघात झाला. अपघात एवढा भीषण आहे की, मृतदेह छिन्नविछिन्न झाले आहेत. टाटा एस गाडीचे दोन तुकडे झाले आहेत.
हेही वाचा..'उडता महाराष्ट्र': बिस्किट, निमंत्रण पत्रिका, बांगड्यांमधून अंमली पदार्थांची तस्करी
मिळालेली माहिती अशी की, टाटा एस गाडी चंद्रपूरवरुन कोल्ड्रिंक व चॉकलेट घेऊन आलापल्ली दिशेने येत होती. तर भरधाव टिप्पर आलापल्लीकडून आष्टीच्या दिशेने जात होता. दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक बसली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कार्तिक धवणे (वय-28), अंबरीश पांढरे (वय-34, दोन्ही रा. चंद्रपूर) अशी मृतांची नावं आहेत. जखमी व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. जखमीला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा...मराठी मालिका आणि ब्राह्मण अभिनेत्री... वादात आता संभाजी ब्रिगेडनेही घेतली उडी
मोटार परिवहन विभागाचे उपनिरीक्षक सुधाकर कुमरे हे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या मदतीने दोन्ही वाहनं बाजुला करण्यात आली. अक्षरश: गाडीचा पत्रा कापून दोन्ही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत बाहेर काढण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या नेतृत्त्वात एपीआय बाळासाहेब शिंदे आणि पीएसआय विनायक दडस करीत आहेत.
पाहा भीषण अपघाताचा VIDEO..
टिप्परची टाटा एसला जोरदार धडक, दोन जण जागेवरच ठार pic.twitter.com/tcjzOqus64
— News18Lokmat (@News18lokmat) March 5, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gadchiroli, Maharashtra news, Major Accident