• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • BREAKING : ठाण्यात मोठी दुर्घटना, घरांवर दरड कोसळली, 5 जणांचा मृत्यू

BREAKING : ठाण्यात मोठी दुर्घटना, घरांवर दरड कोसळली, 5 जणांचा मृत्यू

या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात 1 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे.

  • Share this:
मुंबई, 19 जुलै : मुंबईसह उपनगरात (mumbai rain) पावसाने जोरदार धुमशान घातले आहे. ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) हद्दीतील कळवा (kalwa) पूर्व इथं डोंगर परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कळवा पूर्व  येथील घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळल्याने चार घरांचे नुकसान झाले आहे.  यामुळे शेजाऱ्यांनी तात्काळ चार नागरिकांना बाहेर काढले, तर अद्यापही काही नागरिक अडकल्याची शक्यता असल्याने घटनास्थळी अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू आहे. ना जीवाची पर्वा, ना पाण्याचं भय; मुसळधार पावसातला VIDEO पाहून तुम्हीही सॅल्युट या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात  1 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. मदतकार्य युद्धापातळीवर सुरू आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून ठाण्यात (Thane) पावसानं कहर (Heavy rainfall) केला आहे. ठाणे शहरासह जिल्ह्याला पावसानं चांगलचं झोडपून काढलं आहे. यामुळे ठाण्यातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. तर ठाण्यानजीक असणारा मासूंदा तलाव (Masunda Lake) देखील ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे शहराला पुरजन्य परिस्थिती आली आहे. ठाणे महानगर पालिकेच्या मुख्यालयाबाहेरही गुडघाभर पाणी साचलं आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहेत. 'मी पुढची 25 वर्ष भाजपमध्ये काम करणार'', देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट याशिवाय हाजूरी, राम मारुती रोड, कासारवडवली, वागळे इस्टेट, नौपाडा, जांभळी नाका, पिसे, मानपाडातील काही भाग आणि ठाणे पश्चिम बाजारपेठ देखील पाण्याखाली गेली आहे. तसेच ठाणे शहराला लागून असलेला शिळ डायघर महामार्गदेखील पाण्याखाली गेला आहे. मागील तीन दिवसांपासून हा महामार्ग पाण्याखाली आहे. त्यामुळे रस्त्यावर लांबच्या लांब गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. पण मार्ग बदलल्यानं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे.
Published by:sachin Salve
First published: