मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ही दोस्ती..., नियतीचा क्रुर वार अन् 2 मित्रांनी एकाच कारमध्ये सोडले प्राण

ही दोस्ती..., नियतीचा क्रुर वार अन् 2 मित्रांनी एकाच कारमध्ये सोडले प्राण

अपघातग्रस्त वाहन

अपघातग्रस्त वाहन

नियतीने दोन्ही मित्रांवर क्रूर वार केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Buldana, India

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलडाणा, 30 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. आज सकाळीच सातारा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली होती. ड्रायव्हरला झोप लागल्यावर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली.

नियतीने दोन्ही मित्रांवर क्रूर वार केला आहे. स्विफ्ट कार झाडावर आदळल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहे. चिखली साकेगावजवळील ही घटना घडली. मित्राला सोडायला जाताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

आपल्या मित्राला साकेगाव येथे सोडण्यासाठी जात असलेल्या स्विफ्ट गाडीचाचा भीषण अपघात झाला. मात्र, यावेळी गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार एका झाडावर जाऊन आदळली. त्यात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुनील देव्हारे आणि हर्षद पांडे अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - गर्लफ्रेंडसोबतच्या भांडणात 50 लाखांची मर्सिडीज जळून खाक, तरुणाने डोक्याला लावला हात

साताऱ्यातही घडली भयानक घटना - 

साताऱ्याच्या खंबाटकी बोगद्यात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातामध्ये 2 व्यक्तींचा मृत्यु झाला आहे. तर 5 गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींमध्ये एका दीड वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. सराफ कुटुंबीय पुण्यातील राहणार आहे. चालकाला झोप लागल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. गोकर्ण महाबळेश्वर कडुन‌ ट्रीप संपवुन पुण्याला जात असताना हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये 2 व्यक्तींचा मृत्यु झाला आहे. तर 5 गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींमध्ये एका दीड वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. जखमींना शिरवळच्या जोगळेकर रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Accident, Buldhana news, Death