मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ST bus accident: अकोल्यात एसटी बसला भीषण अपघात, बसने घेतला पेट, LIVE VIDEO

ST bus accident: अकोल्यात एसटी बसला भीषण अपघात, बसने घेतला पेट, LIVE VIDEO

ST Bus accident live video: अकोल्यात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे.

ST Bus accident live video: अकोल्यात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे.

ST Bus accident live video: अकोल्यात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे.

अकोला, 6 ऑक्टोबर : अकोला जिल्ह्यात एसटी बसचा भीषण (Akola ST bus accident) अपघात झाला आहे. एसटी बस आणि ट्रक यांच्यात हा अपघात (ST bus and Truck collide each other) झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर बसने पेट घेतला. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचे व्हिडीओ (Shocking video of accident) समोर आले आहेत. अपघातानंतर एसटी बसने तात्काळ पेट घेतला. या अपघातात दहा प्रवासी जखमी आणि बस चालक गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आली आहे.

बस खामगाव येथून अकोलाकडे जात होती. ट्रक अकोल्या वरून खामगांव कडे जात होता. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील शेळद फाट्या जवळ हा अपघात झाला आहे. ट्रक आणि एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिसांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसने पेट घेतल्याने बचावकार्यात अडथळा येत होता.

हा अपघात नेमका कसा झाला? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये. घटनास्थळी पोलीस, स्थानिक नागरिकांकडून मोठ्या वेगाने मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

पालघरमध्ये दोन एसटी बसमध्ये भीषण अपघात

10 सप्टेंबर रोजी विक्रमगड तालुक्यातील आलोंडे कोकणी पाडा येथील राईसमील जवळ दोन एसटी बसेसचा अपघात झाला होता. डहाणू - ठाणे आणि वाडा-जव्हार बसचा 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बस अक्षरश: चिरली गेली आहे. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी. दोन्ही बसमधील 50 प्रवासी किरकोळ तसेच काही गंभीर जख्मी झाले आहेत. आज सकाळी 9 च्या सुमारास विक्रमगड वरून वाडाकडे जाणारी डहाणू-ठाणे-सातारा तसेच वाड्यावरून येणारी जव्हार-वाडा बस कोकणी पाडा येथील राईसमिल जवळ समोरासमोर एकमेकांना धडकल्या.

हा अपघात घटनास्थळावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघाताचा लाईव्ह व्हिडीओ या सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आला असून अपघात नेमका कसा झाला हे व्हिडीओत दिसत आहे.

First published:

Tags: Accident, Akola