मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Osmanabad Accident: उस्मानाबादमध्ये भीषण अपघात; कार थेट कंटेनरखाली शिरली, चौघांचा जागीच मृत्यू

Osmanabad Accident: उस्मानाबादमध्ये भीषण अपघात; कार थेट कंटेनरखाली शिरली, चौघांचा जागीच मृत्यू

Osmanabad accident news: उस्मानाबादमध्ये भरधाव कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Osmanabad accident news: उस्मानाबादमध्ये भरधाव कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Osmanabad accident news: उस्मानाबादमध्ये भरधाव कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Sunil Desale

बालाजी निरफळ, प्रतिनिधी

उस्मानाबाद, 31 डिसेंबर : भरधाव कार कंटेनरला धडकून भीषण अपघात (major accident in Osmanabad) झाला आहे. उस्मानाबाद - लातूर - बार्शी राज्य महामार्गावर हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त कार ही लातूरच्या दिशेने जात होती. (Car hits container in Osmanabad, killed 4 person on the spot)

अपघातात मृत्यू झालेले चौघेही लातूर जिल्ह्यातील निवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या कंटेनरला कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, कार थेट कंटेनरच्या खाली शिरली. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये.

गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, धक्कादायक VIDEO

औरंगाबादमध्ये भीषण अपघात; गाड्यांचे झाले दोन तुकडे

औरंबादमध्ये काल (30 डिसेंबर 2021) भीषण अपघात झाला आहे. मिनी ट्रक आणि ऊसाच्या ट्रॅक्टरमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड जवळ हा अपघात झाला आहे. या घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लग्नावरून परतणार्‍या छोट्या ट्रकने ऊसाचा ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळातच घटनास्थळी तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू कऱण्यात आले. या अपघातात 12 जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तीन दिवसांपूर्वी पुण्यात भीषण अपघात

28 डिसेंबर रोजी पुण्यात भीषण अपघात झाला होता. पुण्यातील (Pune) नवले पुलाजवळ सातत्याने होणाऱ्या अपघाताची मालिका थांबण्याची चिन्हे अजून तरी दिसत नाही. याठिकाणी 28 डिसेंबरला पुन्हा एकदा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यात तीन जणांचा मृत्यू झालाय. उतारावर कंटेनर मागे सरकल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनांना त्याची धडक बसल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

मुंबईहून सातार्‍याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर हा कंटेनर उताराच्या दिशेने पाठीमागे सरकत गेला. यामध्ये पाठीमागे असणाऱ्या काही वाहनांना त्याची धडक बसली. यामध्ये काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे.

First published:

Tags: Accident, Osmanabad