महाराष्ट्रात उलथापालथ होणार? शरद पवार यांच्या निवासस्थानी मोठ्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी घडामोडींना वेग आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 8, 2019 02:57 PM IST

महाराष्ट्रात उलथापालथ होणार? शरद पवार यांच्या निवासस्थानी मोठ्या घडामोडी

मुंबई, 8 नोव्हेंबर : सत्तास्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर महाराष्ट्र राजकीय अस्थिरतेकडे वाटचाल करतोय का, अशी चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटूनही सत्तास्थापनेचा पेच सुटू शकलेला नाही. ‘जे ठरले तेच हवे’ ही शिवसेनेची भूमिका कायम असून, मुख्यमंत्री पद हा सत्तासंघर्षांतील कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यावर तोडगा निघणे तूर्त तरी कठीण दिसत असल्याने दोन-तीन दिवसांत सत्तापेच न सुटल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट अटळ मानली जाते. पण त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी घडामोडींना वेग आला आहे.

शरद पवार हे आपल्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यानंतर राज्यात निर्माण झालेल्या घटनात्मक पेचावर चर्चा करण्यासाठी वकील माजीद मेमन हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक इथं पोहोचले आहेत. त्यामुळे भाजपने सत्तास्थापनेचा दावा न केल्यास शिवसेना सोबत घेऊन सत्ता मिळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होणार का, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवार यांनी 2014 मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. राज्यात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने अस्थिरतेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपण हा पाठिंबा दिल्याचं स्पष्टीकरण तेव्हा शरद पवार यांनी दिलं होतं. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीतही राज्यात कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा जादुई आकाड गाठता आलेला नाही. त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा राजकीय डावपेच टाकणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

रामदास आठवलेही घेणार शरद पवारांची भेट

आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे शरद पवार यांची आज भेट घेणार असल्याची माहिती आहे. सत्तेच्या नेमक्या कोणत्या समीकरणांबद्दल रामदास आठवले शरद पवारांसोबत चर्चा करणार, हे पाहावं लागेल. परंतु केंद्रात भाजपच्या कोट्यातून आठवले हे मंत्री झाले असल्याने ते शरद पवार यांच्यासमोर भाजपच्या पर्यायाबाबतच चर्चा करण्याची शक्यता अधिक आहे.

Loading...

दरम्यान, राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच आज सुटला नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही सेना-भाजपमध्ये सत्ता स्थापनेच्या दृष्टीने सकारात्मक हालचाली न झाल्याने सरकार कोण स्थापन करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेवर ठाम आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नाही. यांच्यात तोडगा निघाला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल.

VIDEO : शिवसेनेसोबत चर्चा झाली का? जयंत पाटलांचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 02:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...