लढत विधानसभेची : माजलगावमध्ये भाजपच्या उमेदवाराकडे लक्ष

लढत विधानसभेची : माजलगावमध्ये भाजपच्या उमेदवाराकडे लक्ष

माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादीकडून प्रकाश सोळंके यांचं नाव यापूर्वीच ठरलं आहे पण भाजपकडून नेमकं कोणाला तिकीट मिळतं यावर या विधानसभा मतदारसंघातली लढत ठरणार आहे.

  • Share this:

बीड, 20 सप्टेंबर : माजलगाव मतदारसंघातून आतापर्यंत प्रकाश सोळंके हे सर्वाधिक वेळा आमदार झाले होते. असं असलं तरी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके यांचा भाजपाच्या आर. टी. देशमुख यांनी 37 हजार 245 मतांनी पराभव केला.

मागच्या 50 वर्षांत माजलगाव विधानसभा मतदारसंघात बाहेरचा उमेदवार आमदार झाला नव्हता. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून निवडणूक लढलेले आर. टी. देशमुख आमदार झाले. आर. टी. देशमुख यांची ओळख गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय अशीच आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या प्रीतम मुंडे यांना माजलगाव विधानसभा मतदारसंघातून 17 हजाराचं मताधिक्य मिळालं.

रमेश आडसकर यांच्या नावाची चर्चा

या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून रमेश आडसकर यांची जोरदार चर्चा आहे. 2009 मध्ये रमेश आडसकर यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती, त्याच आडसकारांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रमेश आडसकर हे पंकजा मुंडे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जातात.

राष्ट्रवादीकडून प्रकाश सोळंके यांचं नाव यापूर्वीच ठरलं आहे पण भाजपकडून नेमकं कोणाला तिकीट मिळतं यावर या विधानसभा मतदारसंघातील लढत ठरणार आहे. सध्या तिकिटाच्या शर्यतीत रमेश आडसकर यांचं नाव आघाडीवर आहे. मोहन जगताप आणि ओमप्रकाश शेटे यांचीही नावं चर्चेत आहेत. आता यापैकी कुणाची वर्णी इथे लागते ते पाहावं लागेल.

2014 विधानसभा निवडणूक निकाल

आर.टी.देशमुख, भाजप - ११२४९७

प्रकाश सोळंके,राष्ट्रवादी ७५,२५२

=========================================================================================

मोदींनी फटकारल्यानंतर उद्धव ठाकरेंचा नरमाईचा सूर, पाहा हा VIDEO

First published: September 20, 2019, 8:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading