91वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाण्यात

91वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाण्यात

यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाण्याच्या हिवराश्रममध्ये होणार आहे.. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळांची नागपुरात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

  • Share this:

09 सप्टेंबर:  यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाण्याच्या हिवराश्रममध्ये होणार आहे.. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळांची नागपुरात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. मराठवाडा, खान्देश आणि विदर्भाला जोडणारा सेतू म्हणून बुलढाण्याची ओळख आहे. 3 ठिकाणांवरून अर्ज आले होते..बडोदा, दिल्ली आणि हिवराश्रम. त्यात दिल्लीनं माघार घेतली. या निर्णयामुळे साहित्य संमेलनाचं यजमानपद विदर्भाला मिळालंय.

महाराष्ट्रातून सुद्धा केवळ एकच अर्ज प्राप्त झाला होता.  तो अर्ज बुलढाणा जिल्ह्याच्या हिवराश्रम येथून करण्यात आला होता. त्यामुळे महामंडळाने नियुक्त केलेली स्थळ निवड समितीने या तिन्ही ठिकणांना भेट दिली . यातील तिसरी भेट यांनी बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा येथील विवेकानंद आश्रमाला दिली.

आता पर्यंतच्या 300 वर्षाच्या ह्या मराठी साहित्याच्या परंपरेच्या संमेलनाचा मान बुलढाणा जिल्ह्याला एकदाही मिळालेला नाही. त्यामुळे यंदाचे संमेलन हे बुलढाणा जिल्ह्यातच व्हावं व मराठी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम महाराष्ट्रातच व्हावा अशी महाराष्ट्रातील साहित्य प्रेमींची मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2017 08:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading